नांदूरवैद्यच्या राजाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:27+5:302021-09-12T04:17:27+5:30

नांदूरवैद्य : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाची एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये ...

Welcome to the King of Nandurvaidya in Jallosha | नांदूरवैद्यच्या राजाचे जल्लोषात स्वागत

नांदूरवैद्यच्या राजाचे जल्लोषात स्वागत

googlenewsNext

नांदूरवैद्य : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाची एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये वर्षभरातील सर्व सण, उत्सव हे एकजुटीने व मोठ्या आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन साजरे केले जातात. याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील नांदूरवैद्यच्या राजाचे आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात स्वागत करत गणरायाची विधिवत पूजन करत स्थापना करण्यात आली. या गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार एकत्र साजरा केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर वर्षी देखील जय बजरंग क्रीडा मंडळ व भैरवनाथ महाराज मित्र मंडळाच्या दोन्हीही अध्यक्षांनी एकमताने ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय घेण्यात येऊन ‘एक गाव-एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार सर्व गणेश भक्तांनी नांदूरवैद्यच्या राजाची स्थापना केली आहे. गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गणेशोत्सव काळात दहाही दिवस गावामध्ये प्रसादाचे वाटप केले जाते. सकाळ-संध्याकाळ वाद्यांच्या गजरात गणरायाची ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती करण्यात येते. दरवर्षी शिवचरित्रकार, प्रबोधनकार यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. परंतु यावर्षी हा सगळा आनंद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिरावून घेतल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

------------

दरवर्षी सर्वांनाच उत्सुकता असते ती लाडक्या गणरायाच्या आगमनाची. परंतु यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धार्मिक कार्यक्रम व विधी यावर बंदी घालण्यात आल्यामुळे यावर्षी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भाविकांनी गणेशोत्सव साजरा करावा.

- संदीप काजळे,अध्यक्ष, गणेशोत्सव मंडळ, नांदूरवैद्य

------------------

नांदूरवैद्यच्या राजाची सिंहासनावर आरूढ झालेली मूर्ती. (११ नांदूरवैद्य राजा)

110921\11nsk_3_11092021_13.jpg

११ नांदुरवैदय् राजा

Web Title: Welcome to the King of Nandurvaidya in Jallosha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.