महानुभाव परिषद पदयात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:11+5:302021-02-05T05:49:11+5:30
---------------------- सिन्नरला गरजूंना धान्याचे वाटप सिन्नर : येथील शिवसेनेच्या वतीने गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ ...
----------------------
सिन्नरला गरजूंना धान्याचे वाटप
सिन्नर : येथील शिवसेनेच्या वतीने गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी गौरव घरटे, पिराजी पवार, ललित तनपुरे, शंकर वारुंगसे, अवधूत आव्हाड, मंगेश वाजे उपस्थित होते.
--------------------
डुबेरे येथे मोफत किराणा वाटप
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे गरीब कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके मोफत किराणा वाटप करण्यात आले. डुबेरे येथील राव वारुंगसे, पुणे येथील रंभा चॉरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गावातील शंभर कुटुंबांना प्रत्येकी पाच हजारांचा किराणा देण्यात आला. माऊली फाऊंडेशनच्या सदस्यांनी गावातील गरीब कुटुंबांची यादी रंभा चॅरिटेबलला दिल्यानंतर संस्थेच्या वतीने किराणा दिला. यावेळी माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, प्रवीण वारुंगसे, रमेश करणे, अनिल वारुंगसे, शंकर वारुंगसे आदींसह सदस्य उपस्थित होते.
----------------------
तळवाडी येथे लसीकरण मोहीम
सिन्नर : तळवाडी येथे सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने पल्स पोलिओ बुथवर मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी रोटरी क्लब सिन्नर यांच्याद्वारे आयोजन केले होते. नगरपरिषद दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड, सदस्य कैलास क्षत्रीय, संजय आनेराव, रमेश माळी, संजय गाडे, वैभव मुत्रक, नाना भगत, संजय बर्वे यांच्या उपस्थितीत ० ते ५ वयोगटातील लहान मुलांना पोलिओ डोस देण्यात आला.
---------------
सिन्नर वाचनालयास एकवीस ग्रंथभेट
सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचानलयास जोतिषी रामराव सावळीराम हरदास यांच्यासाठी आयोजित शोकसभेत वाचनालच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विशाल हरदास व गोविंद हरदास यांनी वडील रामराव हरदास यांच्या स्मरणार्थ वाचनालयास २१ हजार रुपये रोख तसेच ४०५५ रुपये किमतीचे २१ पुस्तके भेट दिली. देणगीचा स्वीकार वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी केला. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, संचालक चंद्रशेखर कोरडे, राजेंद्र देशपांडे, संजय बर्वे, प्रमोद चोथवे, प्रकाश मुळे आदी उपस्थित होते.