मालेगावी जैन धर्मगुरू विजय रश्मीरत्न महाराजांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:16 AM2021-02-25T04:16:26+5:302021-02-25T04:16:26+5:30
मालेगावी महाराजांचे प्रथमच आगमन झाल्याने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. संघाच्या उपाश्रयात जैनधर्मीयांचे धार्मिक प्रवचन दिले. सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवर ...
मालेगावी महाराजांचे प्रथमच आगमन झाल्याने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. संघाच्या उपाश्रयात जैनधर्मीयांचे धार्मिक प्रवचन दिले. सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या आहेत. व्यसनमुक्ती, कोरोनामुक्ती आदींवर त्यांनी भाष्य केले. तरुण व्यसनाधीन झाले आहेत. त्यांना समुपदेशन दिल्याने ते सुधारत आहेत, तर कोरोनामुक्तीसाठी सर्वांनी लढा द्यायचा आहे. कोरोनासाठी एक कोटी नवकार मंत्र लेखन व जाप करायचा आहे. प्रत्येकाने एक हजार आठ वेळेस नवकार मंत्र म्हणण्याचे आवाहन त्यांनी केले. चार दिवस सुरू असलेल्या प्रवचनात जैन धर्माचे धार्मिक विषय, रामायण, महाभारत, कृष्णकथा, भीष्मकथा, पांडवकथा तर युवक, युवतींसाठी मार्गदर्शनपर प्रवचने सुरू राहणार आहेत. आमच्या माध्यमातून आम्ही गेल्या पंचवीस वर्षांपासून व्यसनमुक्तीची कामे करीत आहोत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक जण व्यसनमुक्त झाले असल्याचे महाराजांनी सांगितले. धार्मिक ज्ञान, संयम, चांगली भावना आदींवर मार्गदर्शन केले. महाराजांसमवेत बारा वर्षीय बालमुनी, करोडोची संपत्ती त्यागून दीक्षा घेतलेले भंवरलाल दोशी यांच्यासह इतर मुनी महाराज, श्री राजस्थान जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे पदाधिकारी, सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.