मालेगावी नववर्षाचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:17 AM2020-01-02T00:17:22+5:302020-01-02T00:18:22+5:30
मालेगाव शहर परिसरात नागरिकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील विविध हॉटेल्समध्ये आबालवृद्धांनी गर्दी केली होती. शहरातील इमारती रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्या होत्या.
मालेगाव : मालेगाव शहर परिसरात नागरिकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील विविध हॉटेल्समध्ये आबालवृद्धांनी गर्दी केली होती. शहरातील इमारती रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्या होत्या.
चाकरमान्यांपैकी अनेकांनी मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी खास सुटी घेऊन विविध कार्यक्रम घेतले. अनेकांनी रात्री उशिरापर्यंत जागत नवीन वर्षाचे स्वागत केले. काहींनी दूरदर्शन संचावर विविध वाहिन्यांतर्फे सुरू असलेल्या मनोरंजक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
नवीन २०२० स्वागतासाठी शहरवासीयांसह आबालवृद्धांनी रात्र जागून काढली. हॉटेल, रेस्टॉरंट, बिअरबार परमीट रूम बुक करण्यात आले होते. शहरातील कॅम्प रस्ता, स्टेट बँक चौक, जुना, नवा आग्रा रस्ता, मनमाड, चाळीसगाव चौफुली, सटाणा रोड, भायगाव रोड आदी परिसरातील हॉटेल्स, ढाबे येथे विद्युत रोषणाई करण्यात आली.
शहरातील पश्चिम भागातील शाकाहारी हॉटेल्समध्ये तीन तारांकित सेवा मिळत आहे. तेथे पंजाबी, साउथ इंडियन, चायनिज पदार्थाच्या नियमित डिशेशशिवाय इतर नवीन व्यंजने खवय्ये ग्राहकांना मिळाली. यासह थंडपेय, विविध ज्युस, मॉकटेल, आईस्क्रीमचे विविध प्रकार उपलब्ध होते. काही लोकांनी घरपोच पार्सल सुविधांचा लाभ घेतला. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली होती. बियरबार परमिट रूमवर पोलीस प्रशासनाची करडी नजर होती. अवैध दारू विक्री रोखण्यात आली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मोक्याच्या ठिकाणांवर लावण्यात आला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेरगावी धार्मिक ठिकाणांवर निसर्गरम्य ठिकाणांवर नागरिकांनी पर्यटन पर्वणी साधली.
राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन
मालेगाव : बाल विद्या निकेतन प्राथमिक शाळेत विविध भाषिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी नववर्षाचे स्वागत केले. विविध धर्माच्या आणि पंजाबी, राजस्थानी, गुजराथी, महाराष्ट्रीयन, मद्रासी आशा विविध भाषिक वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या. ‘चले साथ और बोले साथ’ ही प्रार्थना म्हटली. मुख्याध्यापक नचिकेत कोळपकर आणि सरस्वती काळे यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दीपक आसान यांनी केले. सर्वांनी दांडिया नृत्य केले. सुरेखा पाटील, कल्पना मेधने, शोभा जोशी, सरला पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.