मुलगी झाली हो! सनईच्या सुरात मुलीचं स्वागत; जिल्हा रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 08:22 AM2018-10-18T08:22:03+5:302018-10-18T08:29:43+5:30
स्त्री-जन्माचे स्वागत सन्मानाने व्हावे, या साठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पी.सी.पी.एन.डी. टी कार्यक्रमाअंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
नाशिक : स्त्री-जन्माचे स्वागत सन्मानाने व्हावे, या साठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पी.सी.पी.एन.डी. टी कार्यक्रमाअंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा सातपूर येथील प्रिन्सी सर्वेश तिवारी या महिलेने कन्यारत्नास जिल्हा रुग्णालयात जन्म दिला. जन्म दिल्यानंतर या मातेचा जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे मातेस साडी-चोळी व कन्येस नवीन कपडे भेट देण्यात आले.
या महिलेचे अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ.प्रमोद गुंजाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, अधीसेविका मालिनी देशमुख प्रसूती पश्चात कक्षातील अधिकरी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी रुग्णालय परिसरात सनई वादन व रांगोळी देखील काढण्यात आली होती.