पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:38 PM2020-01-01T22:38:41+5:302020-01-01T22:46:30+5:30
नवीन वर्षाचे सर्वत्र पाश्चिमात्य पद्धतीने स्वागत होत असताना तालुक्यातील देवपूर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करीत नववर्षाचे स्वागत केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन करतानाच विद्यार्थ्यांनी अभिनयातून उपस्थितांचे उद्बोधनही केले.
सिन्नर : नवीन वर्षाचे सर्वत्र पाश्चिमात्य पद्धतीने स्वागत होत असताना तालुक्यातील देवपूर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करीत नववर्षाचे स्वागत केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन करतानाच विद्यार्थ्यांनी अभिनयातून उपस्थितांचे उद्बोधनही केले.
मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाने आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या येसूबाई, मासाहेब जिजामाता यांच्या वेशभूषा तनुजा खोले, दुर्गा गडाख, गौरी गाडेकर, सोनाल कांबळे, वृषाली गडाख या विद्यार्थिनींनी साकारल्या. झाशीच्या राणीची वेशभूषा ईश्वरी गडाख, साक्षी गडाख, अदिती खोले, कावेरी खोले या विद्यार्थिनींनी केली होती. बाळूमामाची वेशभूषा प्रणव पाटील, तर ओमकार गडाख या विद्यार्थ्यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केली होती. तनुजा गडाख परीच्या पेहरावात वावरताना दिसली. कृतज्ञता बोºहाडे, समीक्षा घरटे या विद्यार्थिनींचेही पेहराव लक्षवेधी होते. यासाठी प्राचार्य आर. वाय. मोगल, सुमन मुंगसे, श्रीहरी सैंद्रे, सुनील पगार, वैशाली पाटील, दत्तात्रय आदिक, प्रमोद बधान, ताराबाई व्यवहारे, शंकर गुरुळे, मीननाथ जाधव, गणेश मालपाणी, राजेश आहेर, नानासाहेब खुळे, रवींद्र गडाख, सोपान गडाख, सुवर्णा मोगल, बाबासाहेब गुरूळे, विलास पाटील, नारायण भालेराव, अशोक कळंबे, सतीश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दुर्गा उगले व समृद्धी नरोडे यांनी केले.
इगतपुरीत दूध वाटप
इगतपुरी : नववर्षाचे औचित्य साधून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दूध वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार अर्चना भाकड, प्रवीण अलई, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, रेल्वे सुरक्षा बलाचे अधीक्षक एस. एस. बर्वे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, एसएमबीटीचे अधिकारी डॉ. प्रदीप नाईक, भालचंद्र सुराणा, अ. भा. आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि. ना. उघाडे, आर. जी. परदेशी, अजित लुणावत, अशोक नावंदर, ताराचंद महाराज, घनश्याम रावत, नगरसेवक उमेश कस्तुरे, सत्तार मणियार, डॉ. सचिन सेठी, रवि चांदवडकर, शशिकांत भोंडवे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. प्रास्ताविक आकाश खारके यांनी केले. सूत्रसंचालन हुकुमचंद पाटील यांनी केले. आभार सुनील आहेर यांनी मानले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, अजित पारख, प्रकाश नावंदर, प्रमोद पाठक, उमेश शिरोळे, महेश मुळीक, कृष्णा परदेशी, रामचंद्र नायर, सिंग, प्रसाद चौधरी, शांतिलाल चांडक आदींसह नागरिक उपस्थित होते.
सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी व पथनाट्य सादर करीत सरत्या वर्षाला निरोप दिला, तर २०२० च्या उगवत्या सूर्यकिरणाच्या साक्षीने व्यसनमुक्तीचा संकल्प करत व्यसनाधीनतेची होळी पेटवून नववर्षाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व व्यसनमुक्त ठेवण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून धूम्रपान निषेधाचे बोधचिन्ह तयार केले. मुख्याध्यापक एस.बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना धूम्रपानाचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लोखंडे, सचिव प्रा. टी. एस. ढोली, विश्वस्त अरु ण गरगटे, सरपंच अरु णा रेवगडे, उपसरपंच भगीरथ रेवगडे, आशापूरचे सरपंच विष्णूपंत पाटोळे, अशोक रेवगडे, चंद्रभान रेवगडे, रामभाऊ रेवगडे उपक्र माचे कौतुक केले.