सिन्नर येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखी दिंडीचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 04:02 PM2019-06-22T16:02:40+5:302019-06-22T16:03:11+5:30

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडीे मुक्कामी पुरणपोळी व दूध अशा शाही मेजवाणीचा आस्वाद घेऊन भल्या सकाळी विठुनामाचा जयघोष व टाळ-पखवाजाच्या उत्साही वातावरणात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पालखी दिंडी सोहळ््याचे सिन्नर येथे आगमन झाले.

Welcome to the Palkhi Dindi of Sant Nivruttinatha at Sinnar | सिन्नर येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखी दिंडीचे स्वागत

सिन्नर येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखी दिंडीचे स्वागत

Next

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडीे मुक्कामी पुरणपोळी व दूध अशा शाही मेजवाणीचा आस्वाद घेऊन भल्या सकाळी विठुनामाचा जयघोष व टाळ-पखवाजाच्या उत्साही वातावरणात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पालखी दिंडी सोहळ््याचे सिन्नर येथे आगमन झाले. सिन्नरकरांनी या सोहळ््याचे जोरदार स्वागत केले. त्र्यंबकेश्वरहून पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ््याचे येथील गावठा भागातील मारुती मंदिराजवळ आल्यावर सिन्नरकर भाविकांनी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ची अनुभूती घेत सोहळ््याचे दृश्य ‘याचि देही याचि डोळा’ साठवत सिन्नरकर भाविक संत भजनात दंग झाले. पालखीतील संत निवृत्तीनाथांच्या पादुकांवर नतमस्तक झालेल्या भाविकांचा ऊर भरून आला होता. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखडे, गटनेते हेमंत वाजे, शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, ह. भ. प. त्र्यंबकबाबा भगत, माजी उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, नगरसेवक पंकज मोरे, नामदेव लोंढे, रुपेश मुठे, ज्योती वामने, बाळासाहेब उगले, उदय गोळेसर, अमोल भगत गावातील भजनी मंडळी, वारकरी संप्रदायाचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक सदस्याचे सदस्य आणि सिन्नरकरांनी पालखीचे जोरदार स्वागत केले. या प्रंसगी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान अध्यक्ष पंडीत महाराज कोल्हे, रामकृष्ण महाराज लहवीतकर, पालखी सोहळा प्रमुख पुंडलिक थेटे यांच्यासह सहभागी कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी पालखी मिरवणुकीत पायी चालत निवृत्तीनाथांच्या प्रति असलेला भक्तीभाव व्यतीत केला. त्यानंंतर गावठाभागातून पालखीची शहरातून टाळ-मृदंगांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे पूजन करण्यात येत होते. पालखीच्या दर्शनासाठी सिन्नरकर भाविकांनी गर्दी होत होती. लोंढेगल्लीत भद्रकाली देवी मंदिरात काहीवेळ पालखी दर्शनासाठी थांबविण्यात आली. त्याठिकाणी भाविकांना अल्पोहार देण्यात आला.

Web Title: Welcome to the Palkhi Dindi of Sant Nivruttinatha at Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक