येवल्यात दीक्षार्थी श्वेता चोरडीया यांची स्वागतयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:41 PM2022-02-14T22:41:57+5:302022-02-14T22:44:03+5:30
येवला : येथील विनोद चोरडीया यांची कन्या श्वेता चोरडीया जैनधर्म प्रसार व प्रचारासाठी दीक्षा घेत असल्याने या पार्श्वभूमीवर श्वेता ...
येवला : येथील विनोद चोरडीया यांची कन्या श्वेता चोरडीया जैनधर्म प्रसार व प्रचारासाठी दीक्षा घेत असल्याने या पार्श्वभूमीवर श्वेता यांची शहरातून जैन समाजाच्या वतीने सोमवारी स्वागतयात्रा काढण्यात आली. शहरातील मेन रोडवरील जैन स्थानकापासून निघालेली सदर स्वागत यात्रा शहरातील विविध मार्गांवरून मार्गस्थ होत पुन्हा जैन स्थानक येथे येत स्वागत यात्रेचा समारोप झाला. स्वागत यात्रेत ट्रॅक्टरवरील साधुसंतँचे चलचित्र व साधुसंतांच्या वेशभूषेतील लहान मुले लक्ष वेधून घेत होती. रथामध्ये दीक्षार्थी श्वेता चोरडीया स्वार होत्या. शहरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. सिद्धार्थ छाजेड, सम्यक छाजेड, भूषण बाफणा यांनी दीक्षा महत्त्वाबाबत पथनाट्यही सादर केले.
रामगीत हॉल येथे सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दीक्षार्थी श्वेता चोरडीया यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य महेंद्रकुमार काले, ओसवाल समाज अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ, ज्येष्ठ सदस्य सुवालाल चोरडिया उपस्थित होते. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नवयुवक मंडळाच्या वतीने ह्यफुलोंका तारोंका सबका कहेना है, एक हजारो में मेरी बहना हैह्ण या गीतावर स्तवन म्हटले. येवला श्रीसंघच्या वतीने दीक्षार्थी श्वेता चोरडिया यांचा सम्मानपत्र देऊन सन्मान केला गेला. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे, सूरज मेढे उपस्थित होते. त्यांचाही यावेळी सत्कार केला गेला. कार्यक्रमास कन्हय्यालाल पारख, सतीश समदडीया, कन्हय्यालाल छाजेड, विरचंद शिंगी, पारख भंडारी, सुभाष समदडीया, महेंद्र बाफणा, रजनीकांत समदडीया आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवानी हिरण यांनी केले.
..................(१४ येवला चोरडिया १/२)