राजधानी एक्स्प्रेसचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:26 AM2019-09-14T00:26:29+5:302019-09-14T00:27:08+5:30

रेल्वे मंत्रालयाने मुंबई-निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

 Welcome to Rajdhani Express | राजधानी एक्स्प्रेसचे स्वागत

राजधानी एक्स्प्रेसचे स्वागत

Next

नाशिकरोड : रेल्वे मंत्रालयाने मुंबई-निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
मुंबईवरून नाशिकरोडमार्गे निजामुद्दीन दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस यापूर्वी मुंबईहून बुधवारी शनिवारी दिल्लीला जात होती, तर हजरत निजामुद्दीनहून गुरुवारी आणि रविवारी मुंबईला येण्यासाठी सुटत होती. राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद व गरज लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने मुंबईहून सोमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार असे चार दिवस राजधानी एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे, तर दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी ही गाडी बुधवार, गुरुवार, शनिवार व रविवारी सुटणार आहे. राजधानी एक्स्प्रेस मुंबईहून सुटल्यानंतर नाशिकरोडला सायंकाळी ६.४३ला येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दिल्लीला पोहचते. दिल्लीहून सायंकाळी सव्वापाचला सुटलेली राजधानी एक्स्प्रेस दुसºया दिवशी सकाळी ८.३० वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येते.
नाशिकरोड रेल्वेस्थानकात राजधानी एक्स्प्रेसच्या स्वागतप्रसंगी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, उत्तम कोठुळे, श्याम खोले, शिरीष लवटे, राजू फोकणे, नितीन चिडे, सुभाष घिया, शिवाजी हांडोरे, योगेश देशमुख, विक्रम खरेटे, विक्रांत थोरात, लकी ढोकणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, मुख्य तिकीट निरीक्षक विजय धोंडे, मुख्य आरक्षण अधीक्षक विजय तिवडे, तिकीट बुकिंग अधीक्षक अनिल बागले, मुख्य आरोग्य निरीक्षक अमोल शहाणे आदींनी कार्यक्रमांसाठी संयोजन केले .
चालक, कर्मचाऱ्यांचा सत्कार
आठवड्यातून चार दिवस धावणाºया राजधानी एक्स्प्रेसचे शुक्रवारी दुपारी नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे,  खासदार भारती पवार, आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते  राजधानी एक्स्प्रेस चालक व कर्मचाºयांचा सत्कार करून हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

Web Title:  Welcome to Rajdhani Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.