भगवान अरिहंत मूर्तीच्या पाषाणाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 01:16 AM2021-06-05T01:16:14+5:302021-06-05T01:16:50+5:30

चांदवड  तालुक्यातील मालसाणे येथील  णमोकार तीर्थ येथे ज्ञानयोगी देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येणाऱ्या भगवान अरिहंत मूर्तीसाठी ३६५ टन वजनाचा अखंड पाषाण चांदवड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आला असता, शहरातील सर्व भाविकांनी  महापाषाणाचे जोरदार स्वागत केले. 

Welcome to the stone of the idol of Lord Arihant | भगवान अरिहंत मूर्तीच्या पाषाणाचे स्वागत

भगवान अरिहंत यांच्या मूर्तीसाठी लागणाऱ्या ३६५ टन वजनाच्या पाषाणाचे स्वागत करताना चांदवड येथील भाविक.

googlenewsNext
ठळक मुद्देमालसाणेत साकारणार मूर्ती : ३६५ टन वजनाच्या अखंड पाषाणाचा प्रवास

चांदवड :  तालुक्यातील मालसाणे येथील  णमोकार तीर्थ येथे ज्ञानयोगी देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येणाऱ्या भगवान अरिहंत मूर्तीसाठी ३६५ टन वजनाचा अखंड पाषाण चांदवड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आला असता, शहरातील सर्व भाविकांनी  महापाषाणाचे जोरदार स्वागत केले. 
मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कर्नाटकमधील बेंगलोर जवळच्या देवनहळ्ळी येथून हा ३६५ टन वजनाचा क्रिम कलरचा ग्रेनाईट पाषाण १४४ टायरच्या ट्रेलरमधून आणण्यात आला आहे. हैदराबाद सोलापूर, मोहोळ, मोडलिंब, करमाळा, नगर, शिर्डी, येवला, मनमाड, मालेगाव मार्गे शुक्रवारी  (दि. ४) दुपारी चांदवड शहरात या महाकाय पाषाणाचे आगमन झाले. 
यावेळी  दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र कासलीवाल, उपाध्यक्ष सुभाष अजमेरा, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जव्हारीलाल संकलेचा, ईश्वर बाफना, मांगीलाल कासलीवाल, केशरचंद पाटणी, मोहनलाल अजमेरा,  ॲड. राजेंद्र कासलीवाल, राजेंद्र अजमेरा, दर्शन अजमेरा, शांतिलाल कासलीवाल, वर्धमान पांडे, प्रवीण कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, संजय महाजन, योगेश अजमेरा, अल्केश अजमेरा, सुनील डुंगरवाल, पराग कासलीवाल,  अंकुर कासलीवाल रूपेश अजमेरा, 
मोनू कासलीवाल, अनिल महाजन, नीलेश अजमेरा, महेंद्र अजमेरा यांनी सामूहिक शांती मंत्राचे पठण करत महाकाय पाषाणास पुष्पहार घालून स्वागत केले.  महेंद्र कंकरेज, शरद बोराडे, राजू बिरार यांनीही चांदवडकरांच्यावतीने या या पाषाणाचे स्वागत केले.
येवल्यातही जैन बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत
येवल्यात जैनबांधवांकडूनही  या अखंड पाषाणाचे स्वागत करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, विजय श्रीश्रीमाळ, नंदकुमार अट्टल, अलकेश कासलीवाल, मनोज कासलीवाल, विजय अट्टल यांनी सामूहिक शांतीमंत्राचे पठण करत महाकाय पाषाणास पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी वाहनचालक व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. याप्रसंगी भरत काले, संतोष काले, हितेश पहाडे, सुनील कासलीवाल, यश कासलीवाल, सागर पांडे, प्रितेश पहाडे, अंकाई सरपंच नगीना कासलीवाल, साधना काले, अर्चना कासलीवाल, मंजुषा काले शर्मिला कासलीवाल, सोनाली कासलीवाल, पद्मा कासलीवाल, पुष्पा कासलीवाल आदी उपस्थित होते.
 

Web Title: Welcome to the stone of the idol of Lord Arihant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.