वस्त्रोद्योग धोरणाचे स्वागत मालेगाव : यंत्रमाग उद्योजकांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:43 AM2018-02-07T00:43:53+5:302018-02-07T00:44:50+5:30
मालेगाव : नोटाबंदी, मंदीचे सावट, निर्यातबंदी आदी संकटांमुळे शहरातील यंत्रमाग उद्योग कोलमडून पडला होता. d
मालेगाव : नोटाबंदी, मंदीचे सावट, निर्यातबंदी आदी संकटांमुळे शहरातील यंत्रमाग उद्योग कोलमडून पडला होता. शासनाने वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सूत गिरण्यांनी सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी यासाठी महाऊर्जा संचालक व वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यंत्रमाग उद्योजकांच्या आशा उंचावल्या आहेत.
शासनाने यंत्रमाग उद्योगालाही कमी दराने वीज व अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील यंत्रमाग उद्योजक व कारखानदारांकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून यंत्रमाग उद्योगावर मंदीचे सावट पसरले होते; मात्र राज्य व केंद्र शासनाने वस्त्रोद्योगाविषयीचे धोरण बदलण्यास सुरुवात केली आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीत सूत गिरण्यांना कमी दराने वीजपुरवठा करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव येथील यंत्रमाग उद्योजकांना उभारी मिळणार आहे. सूत निर्मितीचा व्यवसाय जोमाने सुरू होणार आहे. शहरात एक लाखाच्या आसपास यंत्रमाग कारखाने आहेत. येथील कापडाला देशभरात मागणी आहे.