विंचूरला रस्ते सुरक्षा रॅलीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 10:13 PM2021-02-09T22:13:23+5:302021-02-10T00:53:00+5:30
विंचूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने १७ फेब्रुवारी पर्यंत रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे विंचूर येथील तीनपाटी भागात स्वागत करण्यात आले.

वाहन चालकांच्या बेफीकीरीमुळे वाढलेले रस्ते अपघातांचे प्रमाण, या पार्श्वभुमीवर वाहन चालक व नागरीकांमध्ये हेल्मेट व सीटबेल्ट वापरा बाबत जनजागृती करण्यासाठी सदर अभियान राबविण्यात येत आहे. रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी योगेश ताटू, विजय सोळसे, राजेंद्र कराड आदींंसह हेल्मेटधारी दुचाकी स्वार सहभागी झाले होते.
याप्रसंगी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल वाघ, अनंत सावंत, डि. बी. काद्री, नितीन गायकवाड, जगन्नाथ जोशी, प्रकाश जाजू, भाऊसाहेब हुजबंद, संदीप शिरसाट, दिपक घायाळ, सुनील क्षीरसागर, सिकंदर शेख, अस्लम शेख, अरुण तासकर पोलिस हवालदार योगेश शिंदे, कैलास मानकर, अमोल मुंडे, किरण कापसे, अनिल सानप आदी उपस्थित होते.