कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे नाशिकच्या लिंगायतांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 04:10 PM2018-03-20T16:10:32+5:302018-03-20T16:10:32+5:30

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर माहाराष्ट्र लिंगायात संघर्ष समितीने स्वागतकेलेअसूनमंगळवारी (दि.20) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Welcoming the decision of the Karnataka Government to the students of Nashik | कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे नाशिकच्या लिंगायतांकडून स्वागत

कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे नाशिकच्या लिंगायतांकडून स्वागत

Next
ठळक मुद्देकनार्टक सरकाच्या निर्णयाचे नाशकात स्वागत लिंगायत संघर्ष समितीचा पेढे वाटून आनंदोत्सवमहाराष्ट्रातही लिंगायत धर्माचा दर्जा देण्याची मागणी

नाशिक : कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर माहाराष्ट्र लिंगायात संघर्ष समितीने स्वागतकेलेअसूनमंगळवारी(दि.20)नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारनेही राज्यात लिंगायत समाजाला स्वतंत्र धमार्चा दर्जा देण्याचा निर्णय घेण्याची मागणीही यावेळी जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. 
उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने महाराष्ट्रातही लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या 21 टक्के  आहे. तर महाराष्ट्रात जवळपास 90 लाख लिंगायत समाजाच्या नागरिक आहेत. या समाजाला 1931 र्पयत स्वतंत्र धर्माची मान्यता होती. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लिंगायत धर्माची स्वतंत्र ओळख पुसली जाऊन हिंदू लिंगायत अशी ओळख प्रचलित झाल्याचे संघर्ष समितीने जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. कर्नाटक सरकाने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्रातही स्वागत करण्यात येत असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीतर्फे समाजबांधवांना पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी समिती प्रमुख अनिल चौघुले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर दंदणो, ओमप्रकाश कोयटे, अरुण आवटे, दुर्गेश भूसारे आदि उपस्थित होते.

नाशिक मध्ये 29 एप्रिलला मोर्चा
कर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातही लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लिंगायत समाजाच्या या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समिती तर्फे 29 एप्रिलला नाशिक विभागायीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींनी दिली. 

Web Title: Welcoming the decision of the Karnataka Government to the students of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.