हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:16 PM2019-02-01T14:16:41+5:302019-02-01T14:17:27+5:30
जायखेडा : शहरी भागापाठोपाठ शुक्रवारपासून आता ग्रामीण भागातही हेल्मेट सक्तीला प्रारंभ करण्यात आला असून, नियमांचे पालन करीत हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी स्वारांना प्रोत्साहित करण्यासाठी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
जायखेडा : शहरी भागापाठोपाठ शुक्रवारपासून आता ग्रामीण भागातही हेल्मेट सक्तीला प्रारंभ करण्यात आला असून, नियमांचे पालन करीत हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी स्वारांना प्रोत्साहित करण्यासाठी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांंविरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. जायखेडा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ठिक ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर ही धडक मोहीम राबविली. ग्रामीण भागातील दुचाकी स्वारांकडून नियमांचे उल्लंघन करीत विना हेल्मेट सर्रास दुचाकी चालविल्या जातात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून जीवित हानी वाढली आहे. यामुळेच हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून आपल्या कार्यक्षेत्रात वाहतूकीचे नियम, शीट बेल्टचा व हेल्मेटचा वापर याबाबत भिंती पत्रके व हेल्मेट परिधान करून मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात येत होती. या नियमांची आता काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, दुचाकी चालकांनी हेल्मेट केवळ सोबत न वागवता त्याचा प्रत्यक्ष वापर करावा व आपल्या जीविताचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेत पोलीस कर्मचारी गवळी,नेरकर, गायकवाड,भोये,थैल,माळी सहभागी झाले.