विहीर खोदकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:42 AM2018-05-10T00:42:48+5:302018-05-10T00:42:48+5:30

सिन्नर : तालुक्यातील नवीन विहिरींच्या कामाला वेग आला असून, अनेक ठिकाणी विहिरींचे खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे. शेतात जुन्या विहिरी असल्या तरी शेतीचे वाटे झाल्यानंतर नवीन विहिरींची गरज दिवसेंदिवस भासत आहे. त्यातच आता पाणी पातळी खूप खालावल्याने विहिरींची खोलीही वाढवावी लागत आहे. अनेक शेतकरी ओढ्याजवळ किंवा पाणाड्यांकडून जागा पाहून विहीर खोदण्यास प्राधान्य देत आहे.

Well digging | विहीर खोदकामांना वेग

विहीर खोदकामांना वेग

googlenewsNext
ठळक मुद्देटंचाईच्या झळा : नवीन स्रोत शोधण्यासाठी धडपडमेहनतीच्या मानाने मोबदला मिळत नसल्याचे विहीर खोदकामगारांचे म्हणणे

सिन्नर : तालुक्यातील नवीन विहिरींच्या कामाला वेग आला असून, अनेक ठिकाणी विहिरींचे खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे. शेतात जुन्या विहिरी असल्या तरी शेतीचे वाटे झाल्यानंतर नवीन विहिरींची गरज दिवसेंदिवस भासत आहे. त्यातच आता पाणी पातळी खूप खालावल्याने विहिरींची खोलीही वाढवावी लागत आहे. अनेक शेतकरी ओढ्याजवळ किंवा पाणाड्यांकडून जागा पाहून विहीर खोदण्यास प्राधान्य देत आहे.
आता पोकलेनच्या साहाय्याने विहिरी खोदल्या जात असल्याने कमी दिवसात विहिरींचे काम पूर्ण होत आहे. तरीही तळातले काम करण्यासाठी मजूर व क्रेनचाच वापर करावा लागत आहे. दरम्यान ५० ते ७० फुटापर्यंत खोल विहिरी खोदूनही पाणी लागत नसल्याने प्रत्येक नव्या व जुन्या विहिरींवर पाणी पुनर्भरण उपक्रम राबविणे गरजेचे आहे.विहिरीचे तळातले काम खूप जिकिरीचे आणि धोकादायक असून, जीव मुठीत धरून काम करावे लागते. के्रनच्या साहाय्याने मोठ मोठे दगड वर काढताना कामगारांच्या अंगावर पडण्याची भीती असते. यामुळे दक्ष राहून काम करावे लागते. ५० फूट खोल व २० फूट गोलाई असलेल्या विहिरीचे काम १ लाख ८० हजारांत उधडे घेतले जात आहे. मेहनतीच्या मानाने मोबदला मिळत नसल्याचे विहीर खोदकामगारांचे म्हणणे आहे.

Web Title: Well digging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.