सिन्नरच्या पूर्वभागात विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:35+5:302021-03-29T04:09:35+5:30
गतवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली होती. त्या पावसाचा प्रभाव डिसेंबरपर्यंत होता. चांगला पाऊस सुरू झाल्याने परिसरातील ...
गतवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली होती. त्या पावसाचा प्रभाव डिसेंबरपर्यंत होता. चांगला पाऊस सुरू झाल्याने परिसरातील नदीनाले, तलाव यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. यामुळे या विहिरीतील पाण्याचा खरीप हंगामासह रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. रब्बी हंगामातील पिकांची काढणीची कामे सध्या सुरू असून, या पिकांना पाणी देण्याची गरज नसली तरी उशिरा लागवड झालेले कांदापीक तसेच डोंगळे पिकासह मेथी, कोथिंबीर, वांगी, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला पिके सध्या शेतात आहे. वातावरणदेखील ४० अंशाच्या पुढे तापमान असल्याने प्रचंड उष्णतेमुळे पिकांना दिवसाआड पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक भागातील नदी, नाले, तलाव कोरडेठाक पडल्याने विहिरीतील पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे.