जागतिक युवा राजदूतपदी दोघांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:46 PM2017-08-18T23:46:28+5:302017-08-19T00:13:36+5:30

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड अ‍ॅट स्कूल’ उपक्रमांतर्गत जागतिक युवा राजदूतपदी कळवण येथील विनीत देवीदास मालपुरे व अमोल भालचंद्र अलई यांची निवड करण्यात आली आहे.

Wells In Thes In Common In Whatever Being In Common Well In a्यू, কে কে কে রূপ কেয়দয় কে কে কে রূপবাদী কেয়দ keeping | जागतिक युवा राजदूतपदी दोघांची निवड

जागतिक युवा राजदूतपदी दोघांची निवड

Next

कळवण : संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड अ‍ॅट स्कूल’ उपक्रमांतर्गत जागतिक युवा राजदूतपदी कळवण येथील विनीत देवीदास मालपुरे व अमोल भालचंद्र अलई यांची निवड करण्यात आली आहे.
१ आॅगस्ट २०१७ ते ३१ जुलै २०२० या काळात मालपुरे व अलई जागतिक युवा राजदूत म्हणून काम पाहतील. विनीत मालपुरे यांनी जय योगेश्वर बहुद्देशीय संस्थेची स्थापना केली असून, या संस्थेच्या माध्यमातून विनीत व अमोल यांनी सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, आरोग्य, कृषी, पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या कामकाज व समाजकार्याची राष्ट्रसंघाने दखल घेतली आहे.मालपुरे व अलई यांना थेट संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमात जागतिक राजदूत होण्याची संधी मिळाली आहे. युकेचे पंतप्रधान यांच्या पत्नी सारह ब्राऊन या उपक्रमाच्या सहसंस्थापक आहेत.त्यांच्या सहीचे पत्र दोघांना प्राप्त झाले आहे. ग्लोबल पिस फाउण्डेशन तसेच स्वच्छ गृह यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ गृह मोहिमेचे दूत म्हणून विनीत मालपुरे व अमोल अलई काम करत आहेत. भारतातून जागतिक युवा राजदूत म्हणून आमची जी निवड झाली आहे याचा आनंद असल्याचे मालपुरे व अलई यांनी सांगितले. यापुढे चांगल्या प्रकारे काम करण्याचा मानस व्यक्त केला.

Web Title: Wells In Thes In Common In Whatever Being In Common Well In a्यू, কে কে কে রূপ কেয়দয় কে কে কে রূপবাদী কেয়দ keeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.