वेस्ट इज बेस्ट शैक्षणिक साहित्य जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:02 PM2019-01-18T17:02:34+5:302019-01-18T17:03:04+5:30
निफाड, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक, विज्ञान अध्यापक संघ नाशिक, प्रवरा एज्युकेशन इंजिनिअरिंग कॅम्पस, चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४४ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी तयार केलेल्या वेस्ट इज बेस्ट या शैक्षणकि साहित्याने प्रथम क्र मांक पटकावला.
निफाड, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक, विज्ञान अध्यापक संघ नाशिक, प्रवरा एज्युकेशन इंजिनिअरिंग कॅम्पस, चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४४ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी तयार केलेल्या वेस्ट इज बेस्ट या शैक्षणकि साहित्याने प्रथम क्र मांक पटकावला.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक किशोर नावंदर,माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष डी.यु.अहिरे, मुख्याध्यापक संघाचे एस.बी. देशमुख,साहेबराव कुटे, पुरु षोत्तम रकीबे, जिल्हा विज्ञान समन्वयक व उपशिक्षणाधिकारी आर.पी.पाटील, के. डी.मोरे आदीं उपस्थित होते
शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या हस्ते सानप यांना गौरविण्यात आले. गोरख सानप यांनी अतिशय कमी खर्चात वाया गेलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा झाकणांचा आकर्षक पद्धतीने उपयोग करून मुलांना हसत-खेळत अध्यापन करण्यासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. या साहित्यात अक्षरांची फुलदाणी, शब्द खेळ, दशक माळा, शतक तोरण, संख्या मनोरे, वाक्य पट्ट्या, मनोरंजक खुळखुळे, संख्या कार्ड, पझल्स, पाढयांच्या पट्ट्या, शतक पट्ट्या, सब खेलो- सब जितो, चढता-उतरता क्र म, जोड्या लावा, शब्द बनवा, शब्दचक्र , लहान- मोठे ओळखा, बेरीज करा, स्वाध्याय कार्ड, इंग्रजी स्पेलिंग कार्ड, संख्या खेळ, संख्या नगरी, शब्द बनवा, संख्या बनवा, गणति पाटी, संख्या पझल्स, मॅजिक वर्ल्ड यां सारख्या शैक्षणकि साहित्याने जिल्हाभरातून आलेल्या शिक्षक, विद्यार्थी, पालक व अधिकार्यांची वाहवा मिळवली.
सानप यांनी आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.सतत नाविन्यपूर्ण व आकर्षक स्विनर्मित शैक्षणकि साहित्यामुळे त्यांनी हे यश संपादित केले. अतिशय कमी खर्चात टाकाऊतून टिकाऊ असे वेस्ट इज बेस्ट या साहित्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शना साठी निवड करण्यात आली आहे.
सानप यांच्या यशाबद्दल न्या.रानडे विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, अॅड. ल. जि. उंगावकर वि. दा. व्यवहारे , रतन पाटील वडघुले , किरण कापसे , राजेंद्र राठी, राजेश सोनी, किरण कापसे, अॅड. दिलीप वाघावकर, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, निफाडच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, विजय बागुल, केंद्रप्रमुख विश्वास सानप, मुख्याध्यापिका अलका जाधव व पालकांनी अभिनंदन केले.