‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प; जर्मन कंपनी अनुकूल

By admin | Published: January 23, 2015 11:30 PM2015-01-23T23:30:54+5:302015-01-23T23:31:10+5:30

खतप्रकल्पाची पाहणी : अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा

'West to Energy' project; German company friendly | ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प; जर्मन कंपनी अनुकूल

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प; जर्मन कंपनी अनुकूल

Next

नाशिक : जर्मनीतील जीआयझेड या कंपनीच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या खतप्रकल्पाची पुन्हा एकदा पाहणी करत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबविण्याबाबत अनुकूलता दर्शविली असून, अनेक मुद्यांवर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. दरम्यान, खतप्रकल्प चालविण्यास देण्याबाबतही तीन-चार कंपन्यांशी चर्चा सुरू असून, नियमाच्या चौकटीत राहून त्याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
जर्मनीतील जीआयझेड या कंपनीने पालिकेकडे २०१० मध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. ३० टन क्षमतेच्या या प्रकल्पासाठी शहरातील हॉटेलमधून निघणारा कचरा आणि सार्वजनिक शौचालयातील मलजलाचा वापर केला जाणार असून, त्यातून होणारी वीजनिर्मिती ही खतप्रकल्पासाठीच वापरली जाणार आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी जर्मन सरकार प्रारंभी शंभर टक्के अनुदान देणार होते. परंतु नंतर ८० टक्के अनुदान देण्याचे ठरल्याने प्रक्रिया रखडली होती.
दरम्यान, युरोच्या किमतीत झालेल्या बदलामुळे जर्मन कंपनीने महापालिकेला सदर प्रस्ताव स्थगित ठेवण्याची विनंती केली होती. त्यामुळे सदर प्रकल्प अडचणीत आल्याची चर्चा सुरूझाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा जर्मन कंपनीच्या प्रतिनिधींनी खतप्रकल्पाला भेट देऊन पाहणी करत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधींनी खतप्रकल्पावरील बंद मशिनरींबाबतही काही सूचना केल्या असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, खतप्रकल्पावर महापालिका दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करत आहे. खताचीही निर्मिती १० टक्क्यांच्यावर होत नाही. त्यामुळे खतप्रकल्पही चालविण्यास देण्याबाबत तीन-चार कंत्राटदारांशी चर्चा झाली असून, नियमात चौकटीत राहून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'West to Energy' project; German company friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.