पश्चिम आदिवासी पट्टा ओस पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:57 PM2019-01-24T17:57:11+5:302019-01-24T17:57:47+5:30
कंधाणे : बागलाणचा पश्चिम आदिवासी पट्टा सततच्या अवकर्षणग्रस्त परिस्थितीमुळे तसेच शेतीसिंचनाच्या पाणीप्रश्नाची योग्य तड लावण्यायोग्य नेतृत्वाअभावी कोरडा पडत चालला आहे.
कंधाणे : बागलाणचा पश्चिम आदिवासी पट्टा सततच्या अवकर्षणग्रस्त परिस्थितीमुळे तसेच शेतीसिंचनाच्या पाणीप्रश्नाची योग्य तड लावण्यायोग्य नेतृत्वाअभावी कोरडा पडत चालला आहे.
चांगल्या योजना असून ही त्या पुर्णत्वास जाऊ शकत नसल्याने शेती क्षेत्र ओस पडू लागले आहे. या भागातील आरम व हत्ती नदीवरील अपुऱ्या सिंचनाच्या सोयीमुळे शेती सिंचनाच्या प्रश्नाबरोबरच हया भागातील बºयाच गावांच्या पाणीपुरवठा योजना शेवटच्या घटका मोजत आहेत. धरण उशाशी कोरड घशाशीची वेळ लोकप्रतिनिधींच्या डोळेझाक वृत्तीमुळे या आदिवासी भागावर येवुन ठेपली आहे.
आरम नदीवरील अपºया शेती सिंचनाच्या सोयीमुळे अंदाजित १६२० हेक्टर पाटस्थळ क्षेत्र हळूहळू उजाड माळमाथा बनण्यास सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर या भागातील आरम व हत्ती नदींनवर वर बºयाच गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना विसंबुन आहेत नदयांन पाणी तर गावाला पाणी असे समिकरण रूढ झाले आहे मार्च नंतर हया भागातील ब-याच गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो अपु-या पाणीपुरवठया मुळे स्थानिक प्रशासनाला सामान्य नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते हया भागातील पाणीप्रश्नी रान पेटवुन अनेक राजकीय नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे फक्त राजकीय फायदयासाठी पाणीप्रश्नाचा बाऊ केल्याने शेती सिंचनाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे.
बागलाण तालूक्यातील फळ बागायत पाटस्थळ ब्रिटिशकालीन पध्दतीपासून अस्तित्वात असुन एक सुनियोजित पाण्याचे वितरण पाटाद्वारे या प्रणालीत केले जाते केळझर धरणाच्या पाण्याचे शेतीच्या आवर्तनानुसार अंदाजित १६२० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. शासनाला लाखों रूपयांचा शेतसारा, इरिगेशन फी या पाटस्थळा द्वारे मिळत असतांना फक्त पाणीवाटप संस्था स्थापना करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे स्वायत्त या संस्थाना मिळाले शासनाकडून पाटस्थळांना एक रूपया ही निधी मिळत नसल्याने बºयाच फळबागायत पाटस्थळांची अवस्था मरणप्राय झाली आहे.
पाटस्थळ चाºयांचे कॉँक्र ीट करणे, गाळ काढणे, पाण्याच्या योग्य नियोजनासाठी गेट बांधणे यासाठी लाखो रूपयांचा निधी आवश्यक आहे, पण संबंधित खात्याकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. फक्त पाणी आवर्तनाचे पैसे भरा, बाकी तुम्हीं बघा अशी भूमिका हया विभागांनकडून घेतली जात आहे. ही भूमिका या फळबागायत शेतीला मारक ठरत आहे. आरम नदीवर ब्रिटिश कालीन सहा बंधारे आहेत.
या बंधाºयातील पाण्यावर ७३३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. तसेच धरणापासून थेट डावा कालवा २० किमी लांबीचा आहे. या भागाचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा मुख्य जलस्रोत म्हणून केळझर धरणाकडे पाहीले जाते. या धरणातील पाण्यामुळे येथील शेतीचा, पिण्याच्या पाणीप्रश्न मार्गी लागतो.
या भागातील सततच्या कमी पर्जन्यमानामुळे काही वर्षांचा अपवाद वगळता धरणातील अपुरा जलसाठा व धरणात साचलेल्या प्रचंड गाळामुळे पाणीसाठवन क्षमतेत आलेली मर्यादा यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनत चालला आहे. १९८१ मध्ये केळझर धरणाचे काम पुर्ण झाले आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र ५४.३९ चौ. किमी असुन धरणाचा एकूण जलसाठा ६०३.३० दलघफू आहे. गाळामुळे ही क्षमता कमी होत चालेली आहे. गाळ काढण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
गुजरात राज्याकडे वाहून वाया जाणारे पाणी आडवून वळण बंधाºयाद्वारे केळझर धरणात टाकल्यास धरणाच्या जलसाठ्यात वाढ होवून त्याचा उपयोग शेतीसिंचनासाठी होणार आहे. पण हयाकडे केंद्रांतील व राज्यातील लोकप्रतिनिधींनी डोळेझाक केली आहे.
आरम नदीवर कोल्हापुर टाईप बंधारे झाल्यास शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होवुन हया भागात व्यापारी पिंकाचे क्षेत्र वाढीस लागेल. पाणीप्रश्नाबाबत येथील शेतकºयांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडे कैफियत मांडली आहे, पण अद्यापहा विषय मार्गीच लागलेला नाही. बंधाºयांची निर्मिती झाल्यास हया भागातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे
चौकट
साठवण बंधाºयांची कमतरता
गेल्या तीन वर्षापासून सततच्या अपुºया पर्जन्यमानामुळे हा भाग अवर्षणग्रस्त होत चालला आहे. आरम नदीवर पावसाळ्यातील पाणी आडविण्यासाठी साठवण बंधाºयांची कमतरता या कारणाने पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने आलेले पाणी येवुनही काही फायद्याचे ठरत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विंचुरे, कंधाणे, निकवेल, चौंधाणे, दहिंदुले, किकवारी, वटार, चापापाडा, मुंजवाड या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना हत्ती व आरम नदीवर विसंबुन आहेत.
पाणी नसल्याने पिकेही धोक्यात
पाणी आडवा, पाणी जिरवा योजनेचे महत्व या भागात वाढू लागले आहे शेतीच्या पाणीप्रश्नाबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्ररूप धारण करू लागला आहे. ऊस, डाळिंब, द्राक्षे, कांदा, ही प्रमुख व्यापारी पीके हया पट्यात घेतली जातात. ही व्यापारी पीके या भागाचा आर्थिक कणा समजली जातात, परंतु पाणी नसल्याने सदर पीके ही धोक्यात सापडण्याची शक्यता आहे.
कोल्हापुर टाइप बंधारे होणे गरजेचे
शेती सिंचनासाठी आरम नदीवर ३-४ ठिकाणी कोल्हापुर टाइप बंधारे होणे गरजेचे आहे. मांजरपाडा २ प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास १०० एमसीएफटी पाणी केळझर धरणास उपलब्ध होईल, तसेच आरम नदीच्या उगमस्थानाजवळ बरेच पाणी गुजरात राज्यात वाहत जाते ते आडवुन धरणात टाकण्याची योजना आखून कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.