पश्चिमच्या सभापतींचे आंदोलन : उद्यानांच्या दुरवस्थेकडे वेधले लक्ष महापालिकेच्या उद्यान विभागाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:41 AM2017-12-17T01:41:35+5:302017-12-17T01:42:28+5:30

शहरातील उद्यानांची होत चाललेली बकाल स्थिती, अपुरा कर्मचारीवर्ग, एकाच उद्यान निरीक्षकाकडे सहाही विभागांचा कार्यभार, वाहतूक बेटांसह दुभाजकांची झालेली दुरवस्था या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती व कॉँग्रेसच्या नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी शनिवारी (दि.१६) महापालिका मुख्यालयातील उद्यान विभागाला टाळे ठोकले.

The West's Chairman's agitation: In the distant past of the parks, | पश्चिमच्या सभापतींचे आंदोलन : उद्यानांच्या दुरवस्थेकडे वेधले लक्ष महापालिकेच्या उद्यान विभागाला ठोकले टाळे

पश्चिमच्या सभापतींचे आंदोलन : उद्यानांच्या दुरवस्थेकडे वेधले लक्ष महापालिकेच्या उद्यान विभागाला ठोकले टाळे

Next
ठळक मुद्देआंदोलन करत निषेधही नोंदविलाउद्यान विभागाच्या कामकाजाबद्दल आक्षेप

नाशिक : शहरातील उद्यानांची होत चाललेली बकाल स्थिती, अपुरा कर्मचारीवर्ग, एकाच उद्यान निरीक्षकाकडे सहाही विभागांचा कार्यभार, वाहतूक बेटांसह दुभाजकांची झालेली दुरवस्था या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती व कॉँग्रेसच्या नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी शनिवारी (दि.१६) महापालिका मुख्यालयातील उद्यान विभागाला टाळे ठोकले. यावेळी, विभागाच्या कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन करत निषेधही नोंदविला.
पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी शनिवारी गनिमी काव्याने महापालिकेत आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश मिळविला आणि शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांनाही चकवा देत थेट तिसºया मजल्यावरील उद्यान विभागाचे कार्यालय गाठले. डॉ. पाटील यांनी सर्वप्रथम उद्यान विभागात कार्यरत असलेल्या प्रभारी उद्यान अधिक्षकासह सर्व कर्मचाºयांना बाहेर काढले. यावेळी, विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याची तयारी असल्याचे उद्यान अधीक्षक बी. यू. मोरे यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला शेवटचा दिवस असल्याचे सांगत आपल्याला त्यात ओढू नये, अशी विनंती डॉ. पाटील यांना केली आणि ते आपल्या कक्षात निघून गेले. त्यामुळे, डॉ. पाटील यांनी उद्यान विभागातीलच आतील एका कक्षाला कुलूप ठोकत आंदोलन केले. त्यानंतर, विभागाच्या प्रवेशद्वारावर येत त्यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन करत उद्यान विभागाच्या कामकाजाबद्दल आक्षेप नोंदविला.

Web Title: The West's Chairman's agitation: In the distant past of the parks,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.