दोस्तीसाठी काय पण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:00 PM2021-04-08T22:00:34+5:302021-04-09T00:28:44+5:30

लोहोणेर : कोरोनाकाळात मैत्री निभावणे ही अवघड बाब झाली असताना येथील मित्रांनी आपल्या कोरोना बाधित मित्रास मुंबईहून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे तर ते थेट नंदुरबार येथे तात्काळ पोहोच करत मित्रास व त्याच्या कुटूंबास कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यास मदत केली. मैत्रीचा हा किस्सा सध्या कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरला आहे.

But what about friendship .... | दोस्तीसाठी काय पण....

कोरोना बाधीत प्रशांत पवार यांनी रेमडीसीवर इंजेक्शन पोहोच केल्यानंतर त्यांच्यासमवेत जिभाऊ खैरनार, विष्णू शेवाळे, विनय मेतकर.

Next
ठळक मुद्देरेमडीसीवर इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

लोहोणेर : कोरोनाकाळात मैत्री निभावणे ही अवघड बाब झाली असताना येथील मित्रांनी आपल्या कोरोना बाधित मित्रास मुंबईहून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे तर ते थेट नंदुरबार येथे तात्काळ पोहोच करत मित्रास व त्याच्या कुटूंबास कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यास मदत केली. मैत्रीचा हा किस्सा सध्या कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत माहिती अशी की, १९९३-९४ या वर्षात देवळा येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या मित्रांनी गेल्या महिन्यातच व्हाट्सएप ग्रुप बनवत कोण, कुठे, कसे, काय अशी संदेशांची एकमेकांशी भ्रमणध्वनीद्वारे देवाणघेवाण सुरू केली. तब्बल २६ वर्षांनंतर हे सर्व मित्र एकमेकांशी जोडले गेले. त्यात देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील मूळचे रहिवाशी असलेले प्रशांत पवार हे नंदुरबार जिल्ह्यात चिंचपाडा येथील माध्यमिक शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असून त्यांच्यासह पूर्ण पवार कुटूंबियांना कोरोनाने आपला विळखा घातला असल्याचे दुःख या मित्रांच्या ग्रुपवर शेअर करण्यात आले.
याबाबत मित्रांनी आर्थिक तसेच इतर काही अडचण असल्याचे विचारले असता उपचारासाठी रेमडेसीवर इंजेक्शन १०० येथे उपलब्ध होत नसल्याने जीवन धोक्यात असल्याचे व्यक्त केले. यावर सर्वच मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र यश मिळत नव्हते.

यातील एक मित्र खुंटेवाडी (ता.देवळा) येथील माजी सैनिक जिभाऊ खैरनार हे मुंबईत पोलीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लगेचच तातडीने प्रयत्न करीत रेमडीसीवर इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात यश आल्याने तात्काळ कागदपत्रे, वैद्यकीय मागणी व इतर तपशील मागवून घेत सदर रेमडीसीवर इंजेक्शन घेत ते थेट नंदुरबार येथे आपले कोरोना बाधीत मित्र प्रशांत पवार यांचे पर्यत थेट पोहोच केले.
इतका प्रवास करत मित्र आपल्यासाठी इंजेक्शन घेऊन आल्याचे पाहून प्रशांत पवार यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. जिवलग मित्रांमुळे रेमडीसीवर इंजेक्शन वेळेवर उपलब्ध झाल्याने पवार कुटुंबिय समाधानी आहेत. यासाठी किशोर पाटील(पोलीस), विष्णू शेवाळे, विनय मेतकर, दादाजी देवरे यांची खास मदत झाली.

जिभाऊ खैरनार व मित्रांनी माझ्यासाठी केलेली ही लाखमोलाची मदत मी कधीच विसरणार नाही. प्रत्येकाने मित्रांची संपत्ती जपावी व कोरोना काळात आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
- प्रशांत पवार.

Web Title: But what about friendship ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.