शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये चाललं तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:22 AM2019-12-10T00:22:20+5:302019-12-10T00:23:06+5:30
शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागोपाठ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
नाशिक : शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागोपाठ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारावा यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सूत्रे स्वीकारताच पोलीस ठाण्यांना भेटी देण्यास सुरुवात केली होती. जेणेकरून पोलीस ठाण्यांमधील अधिकारी-कर्मचाºयांवर वचक निर्माण होईल.
आयुक्तालयातील संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी पंचवटी पोलीस ठाण्यापासून नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यांच्या कारभार पाहणीला सुरुवात केली होती. पोलीस ठाण्यांमधील कारभार सुधारावा यासाठी सिंह यांनीही वारंवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बैठका घेतल्या. तालुका पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूक होऊन काही महिनेच होत नाही तोच येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब रामकिशन नागदरे, सहायक उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे यांना तालुका पोलीस ठाण्यातील कक्षात लाचेची २२ हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.५) ताब्यात घेतले.
तसेच शुक्रवारी (दि.६) सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही ५० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. जाधव हे तिसºयांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. एकूणच पोलीस ठाणेप्रमुखांकडूनच विविध गुन्ह्यांमध्ये तडजोड करण्यासाठी संशयितांकडून थेट लाचेची मागणी होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये नेमके चालले तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
भ्रष्टाचार संपविण्याचे आव्हान
पोलीस ठाण्यांमधील अधिकाºयांना लागणारी भ्रष्टाचाराची कीड वेळीच संपविण्याचे आव्हान आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांच्या प्रमुखांपुढे उभे राहिले आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या तालुका पोलीस ठाणे आणि आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाण्यांपासून भ्रष्टाचाराची कीड लागण्यास
सुरुवात झाली आहे. यामुळे नांगरे-पाटील व सिंह यांना वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘फवारणी’ करावी लागणार आहे, हे निश्चित.