मखमलाबाद मध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा, अन्य भागात काय?
By संजय पाठक | Published: September 14, 2019 02:56 PM2019-09-14T14:56:25+5:302019-09-14T14:58:33+5:30
नाशिक- मखमलाबाद शिवारात अखेरीस ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प महासभेने मंजुर केला आहेत. राज्य शासनाला या प्रकल्पात स्वारस्य असल्याने त्यासाठी राजपत्रात घाईघाईने इरादा स्पष्ट केला आहे. प्रकल्प चांगला की वाईट, श्ेतकऱ्यांचे भले होईल काय वगैरे मुद्दे बाजुला ठेवले तरी मुळातच अशाप्रकारचे प्रकल्प शहराच्या विशीष्ट भागात राबविण्याच्या मुळ हेतू विषयीच शंका निर्माण होत आहे. म्हणजेच मखमलाबादच्या ज्या एका भागात ही योजना राबविली जाईल तेथे रस्ते, पाणी, लाईट सर्वच आंतरराष्टÑीय दर्जाच्या सुविधा दिल्या जातील मग उर्वरीत भागातील करदाते आणि नागरीकांना सामान्य दर्जाच्या सुविधा कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो.
संजय पाठक, नाशिक- मखमलाबाद शिवारात अखेरीस ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प महासभेने मंजुर केला आहेत. राज्य शासनाला या प्रकल्पात स्वारस्य असल्याने त्यासाठी राजपत्रात घाईघाईने इरादा स्पष्ट केला आहे. प्रकल्प चांगला की वाईट, श्ेतकऱ्यांचे भले होईल काय वगैरे मुद्दे बाजुला ठेवले तरी मुळातच अशाप्रकारचे प्रकल्प शहराच्या विशीष्ट भागात राबविण्याच्या मुळ हेतू विषयीच शंका निर्माण होत आहे. म्हणजेच मखमलाबादच्या ज्या एका भागात ही योजना राबविली जाईल तेथे रस्ते, पाणी, लाईट सर्वच आंतरराष्टÑीय दर्जाच्या सुविधा दिल्या जातील मग उर्वरीत भागातील करदाते आणि नागरीकांना सामान्य दर्जाच्या सुविधा कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो.
केंद्र शासनाच्या वतीने स्मार्ट सिटी उपक्रम राबविला जात आहेत. मुळात स्मार्ट सिटी ही संकल्पना शाश्वत शहरे घडविण्यासाठी आहे. त्यात अनेक फरबदल होऊन स्मार्ट सिटीची संकल्पना राबविण्यात येत आहेत. यातील उत्तम प्रकल्पांना कोणाचाही विरोध नसतो आणि विरोध असण्याचे कारण नाही. अगदी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात कंपनीमार्फत ५१ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव होता त्यातील काही जुन्याचे नवे करून घुसविण्यात आली. त्यापलिकडे जाऊन कालीदास कला मंदिराचे नुतनीकरण हे काम स्मार्ट प्रकल्पात होऊ शकते काय असे अनेक प्रश्न आहेत. परंतु सर्वात मोठा प्रश्न कंपनीच्या ग्रीन फिल्ड या प्रकल्पाविषयी निर्माण होऊ शकतो. नाशिकमध्यच नव्हे तर ज्या शहराची स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झाली आहे, अशा अनेक शहरात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यातून सामान्य नागरीकांना मोठा प्रश्न पडत आहे.
शहराच्या एका भागातील ज्याचे क्षेत्र हरीत आहे, अशा ठिकाणी नगररचना योजना राबवायची आणि सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पन्नास- पंचवन किंवा साठ टक्के जमीन परत फायनल प्लॉट म्हणून द्यायची असा हा प्रकार आहे. कंपनीला मिळालेले प्लाट तर विक्रीसाठी उपलब्ध होतीलच परंतु याठिकाणी रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, बस स्थानके हे सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल. जागतिक दर्जाच्या या सुविधा असतील. त्यामुळे या भागातील जमिनींचे मुल्य देखील वाढेल आणि येथे राहण्यासाठी येणाºया लोकांना उत्तम दर्जाच्या सेवा मिळतील. योजना खूप चांगली आहे. शेतकºयांच्या शेतीला शहरात यापेक्षा चांगले मोल कदाचित मिळणार नाही. परंतु प्रश्न मुळ उद्देशाचा आहे. शहराच्या एका भागात जागतिक दर्जाच्या सुविधा देताना शहरातील अन्य भागातील नागरीकांचे काय, ते करदाते नाहीत काय, मग वर्षानुवर्षे येथे राहणाºया नागरीकांना दुय्यम दर्जाच्या सुविधा दिल्या जातात. मग कंपनीच्या विशेष प्रकल्पातील क्षेत्रासाठीच विशेष सेवा का द्यायच्या ? एखाद्या शेती क्षेत्राचे रहीवासी क्षेत्रात रूपांतर झाल्यानंतर तेथे त्याने प्लाट पाडण्यासाठी अभिन्यास मंजुरीला सादर केला आणि तो मंजुर झाल्यानंतर तेथे लोक राहण्यास आले तरी ५० टक्के लोक संख्या झाल्याशिवाय महापालिका त्या भागात रस्ते देत नाही आणि मग येथे विशेष प्रकल्पात या सर्व सुविधा अगोदरच देणार.
जेथे अगोदरच पायभूत सुविधा आहेत, विशेषत: गुळगुळीत रस्ते, स्मार्ट लायटींग, ई टायलेटस, स्मार्ट बस स्टॉप आहेत, अशा सर्व विकली जाणारी घरे ही निश्चीत अल्प उत्पन्नातील वर्गासाठी किंवा मध्यवर्गींयासाठी नसणारच, मग विशिष्ट धनिक वर्गासाठीच या सुविधा असतील आणि उर्वरीत नागरीकांना सामान्य, सुमार दर्जाच्या सुविधा राहणार काय, असा मुलभूत प्रश्न आहे. विकासाविषयी कोणाचे दुमत नसते. विकास सर्वांनाच हवा असतो. मात्र तो सर्व क्षेत्र, सर्व घटक आणि सर्व वर्गांसाठी समानेच्या तत्वावर असावा. शहराच्या एका कोपºयातील विकास आणि त्याच शहरातील करदात्यांना वेगळी वागणूक हा समान विकास कसा होऊ शकेल. मुळात ही संकल्पना राबविताना शहरातील प्रत्येक नागरीक या कंपनीचा लाभार्थी किंवा स्टेक होल्डर आहे, मग असे असेल तर त्याच्यावरच अन्याय का? म्हसरूळ, देवळाली, चेहेडी असो अथवा सातपूर, चुंचाळे..याभागात विकास पोहोचणार नसेल तर स्मार्ट सिटीची मुळ संकल्पना कोणाला आणि किती समजली याचाच फेरविचार करण्याची गरज आहे.