मुख्यमंत्रीच काय, त्यांना पंतप्रधान व्हावेसे वाटेल - गिरीश महाजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:34 PM2018-08-06T17:34:56+5:302018-08-06T17:36:46+5:30

जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ अप्रत्यक्षपणे खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल.

What is the Chief Minister, he would like to become Prime Minister - Girish Mahajan | मुख्यमंत्रीच काय, त्यांना पंतप्रधान व्हावेसे वाटेल - गिरीश महाजन 

मुख्यमंत्रीच काय, त्यांना पंतप्रधान व्हावेसे वाटेल - गिरीश महाजन 

Next

नाशिक - जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. पण, भारतीय जनता पक्षात कोणत्याही पदावर नियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, असे उदाहरणही महाजन यांनी यावेळी दिले. नाशिक येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी खडसेंना लक्ष्य केले.

भाजपमधील ज्येष्ठ नेते आणी माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या अडगळीत पडल्याचे दिसून येते. तसेच पक्षाकडून सातत्त्याने त्यांना डावलण्यात येत असल्याचे दिसते. त्यातच, आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर तोफ डागली आहे. खडसेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना महाजन यांनी खडसेंना चांगलाचा टोला लगावला. जळगावमधील एका कार्यक्रमात खडसे यांनी ज्येष्ठतेनुसार आपणच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे विधान केले होते. त्याविषयी महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी राजकारणात सर्वानाच मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हावेसे वाटते, असे सांगितले. भाजपमध्ये कोणत्याही पदनियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळात आणि मंत्रिमंडळाबाहेर अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी खडसेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. दरम्यान, जळगाव महापालिका निकालातही एकनाथ खडसेंऐवजी गिरीश महाजन यांनाच किंगमेकर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये खडसेंची कोंडी होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. 

Web Title: What is the Chief Minister, he would like to become Prime Minister - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.