'फिल्ड में जायेंगे तो समझेंगे'; पुराच्या पाण्यात उतरुन मदत करणाऱ्या आसामच्या उपायुक्तांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 06:29 AM2022-05-29T06:29:50+5:302022-05-29T06:51:24+5:30

भारतीय प्रशासकीय सेवेतील कीर्ती जल्ली आसामच्या कचर जिल्ह्याच्या उपायुक्त.

What could be more important than saving lives ?; Kirti Jalli's interview to Lokmat | 'फिल्ड में जायेंगे तो समझेंगे'; पुराच्या पाण्यात उतरुन मदत करणाऱ्या आसामच्या उपायुक्तांचं मत

'फिल्ड में जायेंगे तो समझेंगे'; पुराच्या पाण्यात उतरुन मदत करणाऱ्या आसामच्या उपायुक्तांचं मत

Next

- मेघना ढोके

नाशिक : ‘पुरात अडकलेल्या लोकांना मदतीचा हात देणे ही एकमेव गोष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी कामाला लागले. पाणी कुठे जास्त भरले आहे याचा अंदाज घेतला. पुरामुळे जमीनच वाहून गेल्याने तेथील माणसांना बाहेर काढणे मोठे आव्हान होते. फिल्ड में जायेंगे तो समझेंगे... एवढंच मनाशी पक्के करून मी कामाला लागले..’ कीर्ती जल्ली सांगत असतात. 

भारतीय प्रशासकीय सेवेतील कीर्ती जल्ली आसामच्या कचर जिल्ह्याच्या उपायुक्त. आसामचे जनजीवन अक्षरश: उद्ध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्यात उतरून, प्रसंगी चिखलात अनवाणी चालत, तर कधी बोटीतून जात आपद्ग्रस्तांना मदतीचा हात पोहोचविणाऱ्या कीर्ती जल्ली यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली. 

त्यांच्याशी ‘लोकमत’ने दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. कीर्ती पुढे म्हणाल्या, ‘पुरात अडकलेल्या माणसांचे जीव वाचवण्यापेक्षा दुसरे काय महत्त्वाचे आहे? पुरामुळे आसामात हाहाकार उडाला आहे. सर्वाधिक फटका कचर जिल्ह्याला बसला आहे.’राजधानी गुवाहाटीशीच नाही तर शेजारी मेघालयाशीही संपर्क तुटलेला असताना कीर्ती यांनी अत्यंत हिमतीने आपत्ती व्यवस्थापन केले. 

मदतीमुळे ग्रामस्थ भारावले-

कचर जिल्ह्यात बराक नदी उधाणलेली असताना कीर्ती यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने ३५० हून जास्त मदत छावण्या आणि ६०० हून अधिक मदत वाटप केंद्रे सुरू केली. चैत्रा या गावी त्या गेलेल्या असतानाच कीर्ती यांची छायाचित्रे व्हायरल झाली. ज्या गावांनी कधी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा चेहरा पाहिला नव्हता, त्या गावात कीर्ती प्रत्यक्ष पोहोचल्याने ग्रामस्थ भारावून गेले. 

मराठी सासर... 

कीर्ती यांचा विवाह कोरोनाकाळात झाला. सार्वजनिक सुटीच्या दिवशी छोटेखानी समारंभात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांचे सासरचे आडनाव जगताप आहे. मूळचे सासवडचे असलेले जगताप कुटुंबीय सध्या पुण्यात स्थायिक आहेत. कीर्ती यांच्या विवाहसोहळ्याला त्यांचे आई-वडील हैदराबादहून येऊ शकले नाहीत. कुटुंबाची साथ आहे, माझी माणसे माझ्या पाठीशी आहेत म्हणून जमते. माणसांचा जीव वाचवण्यासाठी यंत्रणा उभारणे हे माझे काम होते, तेच मी तेव्हाही केले आणि आताही करत आहे, असे कीर्ती जल्ली नमूद करतात.

Web Title: What could be more important than saving lives ?; Kirti Jalli's interview to Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.