पक्षबदलू उमेदवारांकडून काय अपेक्षा करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:08 AM2019-10-12T01:08:40+5:302019-10-12T01:09:00+5:30
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या एक गठ्ठा मतदानाकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा करणार? असे सांगत चर्चेला सुरुवात केली.
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : नवीन नाशिक, ज्येष्ठ नागरिक मंडळ
सिडको : विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या एक गठ्ठा मतदानाकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा करणार? असे सांगत चर्चेला सुरुवात केली.
सध्या प्रत्येक पक्षातील नेते, आमदार स्वत:च्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसºया पक्षात प्रवेश करीत असून, यामुळे त्यांच्याकडून सामान्यांसाठी काय अपेक्षा करणार? असे मत एका ज्येष्ठाने मांडत चर्चेला सुरुवात केली. त्यावर एकाने निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षात भरतीला सुरुवात होत असल्याचे सांगितले. एका ज्येष्ठाने निवडणूक ही पारदर्शी असायला हवी असे सांगत निवडणुकांत होणाºया पैसे वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकाने तरुणाईमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, कोणतेही सरकार कामाचे नसल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील बंद पडणाºया कंपन्यांच
काही दिवसांपासून राज्यात अनेक मोठे नेते एका पक्षातून दुसºया पक्षात जात असून यामुळे त्यांच्या प्रतिमेला फटका बसत आहे. त्यामुळे जनतेतून असे नेते, उमेदवारांबाबत संभ्रमतेची भावना निर्माण होत आहे. एकप्रकारे जनतेचा त्यांच्यावरून विश्वास उडत आहे.