निर्बंधांच्या वेळेतही काय हवे ते सांगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:48+5:302021-07-26T04:13:48+5:30

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने बाजारपेठा सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना दिलेल्या असल्या तरी शहर परिसरात ...

What do you want even in times of restrictions? | निर्बंधांच्या वेळेतही काय हवे ते सांगा?

निर्बंधांच्या वेळेतही काय हवे ते सांगा?

Next

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने बाजारपेठा सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना दिलेल्या असल्या तरी शहर परिसरात अनेक दुकाने चारनंतरही सुरू राहत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी चार वाजता शटर ओढून घेतले जाते मात्र आतमध्ये दुकान, हॉटेल पूर्णपणे सुरू राहत असून ग्राहकांना पाठीमागच्या बाजूने प्रवेश दिला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. काही परिसरांमध्ये तर दुकानदार चार वाजता दुकान बंद करता आणि सहा वाजेनंतर पुन्हा सुरू करत प्रशासनाची दिशाभूल करत आहेत. काही दुकानांचे मालक चारनंतर दुकानाबाहेरच उभे राहतात. शटर बंद असले तरी ग्राहक आलेच तर अर्धवट शटर उघडून ग्राहकाला हवी ती वस्तू दिली जाते.

कोरोना काळात दुकानदारांवर झालेली कारवाई

५२२

हे घ्या पुरावे !

दहीपूल परिसर सायंकाळी ५ वाजता :

शहरातील दहीपूल परिसरात फेरफटका मारला असता या परिसरात सायंकाळी चारनंतरही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक दुकाने सर्रासपणे सुरू होती. तर काही दुकानांमध्ये शटर अर्धवट ओढून व्यवसाय सुरू असल्याने तेथेही ग्राहकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले.

शालीमार परिसर सायंकाळी ६ वाजता : मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शालीमार चौकातही चारनंतर अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. काही ठिकाणी दुकान पूर्णपणे सुरू होते तर काहीनी अर्धवट शटर ओढून ग्राहकांना आत प्रवेश दिला होता. यामुळे चारनंतर बाजारपेठ बंद असल्याचे कुठेही दिसून आले नाही.

चौकट-

या दुकानांवर लक्ष कोणाचे?

सायंकाळी चार वाजेनंतर बाजारपेठ बंद व्हावी यासाठी पोलिस यंत्रणा आणि महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. चार वाजता विविध परिसरात फिरून पोलिस दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करतात. काही ठिकाणी महापालिकेचे अधिकारीही फिरत असतात. पोलिस गाडी येते तेव्हा दुकानांचे शटर पूर्णपणे बंद केले जाते मात्र गाड्या निघून जाताच अनेक दुकानदार पुन्हा शटर अर्धवट उघडून दुकाने सुरू करत असल्याचेही दिसते.

चौकट-

किराणा हवा की जेवण?

हॉटेल चारनंतर बंद करण्याच्या सूचना असल्या तरी अनेक हॉटेलांमध्ये रात्री ८-९ वाजेपर्यंत खाण्यास मिळू शकते. याचा अनुभव नांदूरनाका परिसरात फिरताना आला. सहा वाजता येथील हॉटेलमध्ये प्रवेश केला असता तेथे जेवणासह सर्वकाही मिळत असल्याचे सांगण्यात आले. काही ग्राहक पदार्थांचा आस्वाद घेताना दिसून आले. त्याचबरोबर उपनगर परिसरातील एका दुकानात हवे असलेले सामान देण्याची तयारी दुकानदाराने दाखविली.

Web Title: What do you want even in times of restrictions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.