मिमी, टीएमसी, एमसीएफटी म्हणजे नेमकं असतं तरी काय...?

By अझहर शेख | Published: June 12, 2020 10:32 PM2020-06-12T22:32:33+5:302020-06-12T22:43:27+5:30

गंगापूर धरणात शुक्रवारी (दि.१२) रात्री दहा वाजेपर्यंत ८ एमसीएफटी अर्थात ८ दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणाचा जलसाठा ४७ टक्के इतका झाला आहे.

What exactly is mm, TMC, MCFT ...? | मिमी, टीएमसी, एमसीएफटी म्हणजे नेमकं असतं तरी काय...?

मिमी, टीएमसी, एमसीएफटी म्हणजे नेमकं असतं तरी काय...?

googlenewsNext
ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये मोजला जातोधरणातील पाण्याचा विसर्ग क्युसेकमध्ये मोजला जातो

अझहर शेख, नाशिक : जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरूवात झाली की दरवर्षी पावसाळ्यात‘क्युसेक’, मिमी, टीएमसी, एमसीएफटी असे शब्द वाचायला किंवा ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळही उडतो तर काहींना त्याचे कुतुहलही वाटते. खरे तर हे गणितामधील पाऊसपाणी मोजण्याचे परिमाण (संज्ञा) आहे आणि सामान्यज्ञान सुध्दा. मात्र या शब्दांचा दैनंदिन जीवनात फारसा संबंध येत नसल्यामुळे त्यांचा अर्थ अनेकदा विस्मरणात जातो. जाणून घेऊया, नेमके पावसाचे हे गणित असते तरी कसे...

धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये मोजला जातो.

पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये (मिमी) मोजला जातो

धरणातील पाण्याचा विसर्ग क्युसेकमध्ये मोजला जातो.

२५.४ मि.मी : १ इंच
१ घनफूट म्हणजे २८.३१७ लिटर्स पाणी
१ एमसीएफटी : १ दशलक्ष घनफूट (१० लाख घनफूट पाणी)
१ टीएमसी पाणी = १,००० दशलक्ष घनफूट (१ अब्ज घनफूट पाणी)
१ घनफूट प्रति सेकंद म्हणजे १ क्युब प्रति सेकंद असा होतो.
१ घनफूट पाणी म्हणजे २८.३१७ लिटर्स पाणी होय.

जेव्हा गंगापूर धरणातून १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो तेव्हा गोदापात्रात (१,०००ला २८.३१ ने गुणने) २८ हजार ३१० लिटर्स इतके पाणी प्रति सेकंदाला प्रवाहित होते.
धरणातून जेव्हा २४ तासांत सातत्याने ११ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला तर त्या धरणाचा जलसाठा २४ तासानंतर १टीएमसी अर्थात १ हजार दशलक्ष घनफूटाने कमी होईल.
५ हजार ६४०दशलक्ष घनफूट अर्थात साडेपाच टीएमसी इतकी साठवण क्षमता गंगापूर धरणाची आहे. गंगापूर धरणात शुक्रवारी (दि.१२) रात्री दहा वाजेपर्यंत ८ एमसीएफटी अर्थात ८ दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणाचा जलसाठा ४७ टक्के इतका झाला आहे. यामधून महापालिकेने शहराच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी राखीव पाणी वापरात घेतले.

 

 

 

 

Web Title: What exactly is mm, TMC, MCFT ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.