स्वत: पलीकडे खेळाडूंसाठी केले काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:52 AM2018-07-28T00:52:47+5:302018-07-28T00:53:01+5:30
खेळाडूंचा विकास आणि राज्य पातळीवर पोहोचलेल्या खेळाडूंच्या पाठीमागे उभे न राहाता त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे अनेक खेळाडूंचा विकास होऊ शकला नाही. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी राज्य पातळीवरील नाशिकच्या खेळाडूंसाठी भूमिका घेत नसल्याचा आरोप परिवर्तन पॅनलचे प्रणेते बलविंंदरसिंग (प्रिन्सी) लांबा, प्रमोद गोरे यांनी केला.
नाशिक : खेळाडूंचा विकास आणि राज्य पातळीवर पोहोचलेल्या खेळाडूंच्या पाठीमागे उभे न राहाता त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे अनेक खेळाडूंचा विकास होऊ शकला नाही. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी राज्य पातळीवरील नाशिकच्या खेळाडूंसाठी भूमिका घेत नसल्याचा आरोप परिवर्तन पॅनलचे प्रणेते बलविंंदरसिंग (प्रिन्सी) लांबा, प्रमोद गोरे यांनी केला. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने गेल्या पंधरा वर्षांत नाशिकच्या क्रिकेट विकासासाठी उपयुक्त अशी कामे केलेली नाहीत. येथे एकाधिकारशाही असून, इतर पदाधिकारी केवळ होकार देण्यासाठीच आहेत. नाशिकचे क्रिकेट या असोसिएशनसाठी केवळ स्टेटस सिम्बल झाले आहे असा आरोप लांबा यांनी केला आहे. नाशिकच्या खेळाडूंना राज्य आणि राष्टÑीय पातळीवर नेण्याची मानसिकता या कमिटीची नाही. महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनवर खंबीर भूमिका न मांडता स्वत:ला सावरण्यासाठीच असोसिएशनचा वापर केला जात आहे. नाशिकचा मुर्तझा ट्रंकवाला हा रणजीमध्ये शतक काढल्यानंतरही त्याला दुसºया सामन्यात बसविले जाते, तरीही नाशिक क्रिकेट असोसिएशन गप्प आहे. असोसिएशनवर तेच तेच चेहरे असून, नव्या लोकांना संधी दिली जात नाही. त्यामुळे परिवर्तन घडविण्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आम्ही लढवित आहोत.