होशवालोंको खबर क्या ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:16+5:302021-02-11T04:17:16+5:30

नाशिक : बहोत ख़ूबसूरत है, तनहा तनहा दुख झेलेंगे, कभी शाम ढले, अपना ग़म लेके अशा ...

What is the news of the conscious ... | होशवालोंको खबर क्या ...

होशवालोंको खबर क्या ...

Next

नाशिक : बहोत ख़ूबसूरत है, तनहा तनहा दुख झेलेंगे, कभी शाम ढले, अपना ग़म लेके अशा एकाहून एक सरस गजल्सनी गजलप्रेमींना मनमुराद आनंद दिला. फेसबुक लाईव्ह माध्यमातूनझालेल्या या कार्यक्रमाने शायर निदा फ़ाज़ली ह्यांच्या जगजीत सिंह यांनी स्वरबद्ध केलेल्या प्रसिद्ध रचना सादर सादर करुन जगजीसिंह यांना संगीतमय आदरांजली वाहिली.

दहा वर्षांपूर्वी जगजीत सिंह यांचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या जयंती आणि पुण्यस्मरण दिनी दरवर्षी नाशिकमधील गझल गायक प्रसाद गोखले आणि वीणा गोखले चाहत्यांसाठी त्यांच्या अजरामर गाण्यांचा कार्यक्रम करत असतात, ही परंपरा त्यांनी कायम राखली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी 'मै रोया परदेस में' हा दोहा तर त्यानंतर ' कभी किसी को मुकम्मल' सादर करण्यात आली. पुढे जीवन क्या हैं, अपनी मर्जी से कहां, सफ़र में धूप तो होगी, होश वालों को खबर, बहोत ख़ूबसूरत है, तनहा तनहा दुख झेलेंगे, कभी शाम ढले, अपना ग़म लेके, जब किसी से कोई, बदला ना अपने आप, धूप में निकलो ह्या गझलांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात किसका चेहरा, हर तरफ़ हर जगह, दुनिया जिसे कहते हैं ह्या युगल गझल प्रसाद आणि वीणा यांनी सादर केल्या. कार्यक्रमात गौरव तांबे (तबला), दीपक तरवडे (सिंथेसाईझर), नयन देवरे ( ऑक्टापॅड), आशिष ढेकणे (गिटार), किरण गायधनी ( ध्वनि) यांनी साथसंगत केली. तर कार्यक्रमाचे निवेदन शशांक कांबळे यांनी केले.

रसिक श्रोत्यांची दाद

जगजीत सिंह यांनी विविध चित्रपटांसाठी गायलेल्या प्रसिद्ध ‘तुम को देखा, तुम इतना जो, झुकी झुकी सी, होठो से छूलो तुम’ या गजलादेखील त्यांनी सादर केल्या. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमाची सांगता 'गरज बरस प्यासी धरती पर' या भावपूर्ण गझल प्रार्थने ने प्रसाद गोखले यांनी करुन गुरुंना संगीतमय श्रद्धांजली समर्पित केली.

Web Title: What is the news of the conscious ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.