मतदानानंतर काय म्हणतात वृद्ध?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:48 AM2019-10-22T00:48:13+5:302019-10-22T00:49:04+5:30
Maharashtra Assembly Election 2019 मतदान करणे आपले कर्तव्य आहे. लोकशाही भक्कम करण्यासाठीच्या भावनेने मी आलो आहे. मतदान करणे एकप्रकारचा आनंद असतो. राज्याच्या व गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करावे.
मतदान करणे आपले कर्तव्य आहे. लोकशाही भक्कम करण्यासाठीच्या भावनेने मी आलो आहे. मतदान करणे एकप्रकारचा आनंद असतो. राज्याच्या व गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करावे. तसेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे..
- भाई पुंजा माळोदे, आडगाव
गेल्या ५०-६० वर्षांपासून मतदान करत आले आहे. आजवर प्रत्येक निवडणुकीत मतदान केल्याचा आनंद आहे. मतदानाचा हक्क बजाविणे एवढे माहीत आहे, मात्र मतदान केल्यानंतर समाधान लाभत असते. आता हे मशीन आल्यापासून थोडा गोंधळ होतो. यासाठी आम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागते.
- भीमाबाई शिंदे, मखमलाबाद
मतदान करणे हा सर्वांचा हक्क आहे आणि तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत मी आवर्जून मतदान केले आहे आणि त्याचे समाधानही आहे. वयाच्या ८९व्या वर्षी मतदान केल्याचा आनंद आहे, मात्र निवडणुकीनंतर आमदारांनी आमच्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. आमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे.
- हिराबाई शिंदे, मखमलाबाद
९०व्या वर्षी मतदान करत असून, आजवर अनेक निवडणुका बघितल्या. प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्यासाठी येत असतो आणि त्याचा आनंदही आहे. मतदानामुळे आपल्याला योग्य त्या लोकप्रतिनिधीची निवड करण्याचा अधिकार मिळाला आहे आणि प्रत्येकाने त्या अधिकाराचा पूर्ण वापर करणे गरजेचे आहे.
- आप्पा कुलकर्णी, गंगापूररोड
देशातील लोकशाही अबाधित राहावी यासाठी आतापर्यंत मतदान करीत आले आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणारे सरकार सत्तेत यावे, अशी अपेक्षा आहे. ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न आहे. प्रामुख्याने उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी सत्तेत येणाऱ्या सरकारने प्रयत्न करणे गरजचे आहे.
- गुलाबबाई खाबिया, ज्येष्ठ नागरिक