पारावर एकच विषय ग्रामपंचायतनिवडणुकीचा एक्झिट पोल काय ?...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 05:45 PM2021-01-17T17:45:43+5:302021-01-17T17:48:07+5:30

पिंपळगाव बसवंत : कोणतीही निवडणूक असली की वाहिन्यांचे प्रतिनिधी तज्ज्ञांना सोबत घेत विजय-पराजयाचा अंदाज बांधतात. निवडणूक संपली रे संपली की एक्झिट पोलच्या आकड्यांवर चर्चा झडत असते. ग्रामपंचायत निवडणुकीत तसे होण्याची सुतराम शक्यता नसली तरी गावागावांतील पारावर, चहा टपरी, सलून दुकाने आणि सोशल मीडियाच्या वॉलवरून गावगुंडी खेळणाऱ्या धुरिणांनी निवडणूक वार्तापत्र सुरू केले आहे. अंदाज अपना अपना अशा पद्धतीने हा एक्झिट पोल सुरू आहे

What is the only issue on the exit poll of Gram Panchayat elections? ... | पारावर एकच विषय ग्रामपंचायतनिवडणुकीचा एक्झिट पोल काय ?...

पारावर एकच विषय ग्रामपंचायतनिवडणुकीचा एक्झिट पोल काय ?...

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : जेवणाच्या अन‌् पैशांच्या लागल्या पैजा

पिंपळगाव बसवंत : कोणतीही निवडणूक असली की वाहिन्यांचे प्रतिनिधी तज्ज्ञांना सोबत घेत विजय-पराजयाचा अंदाज बांधतात. निवडणूक संपली रे संपली की एक्झिट पोलच्या आकड्यांवर चर्चा झडत असते. ग्रामपंचायत निवडणुकीत तसे होण्याची सुतराम शक्यता नसली तरी गावागावांतील पारावर, चहा टपरी, सलून दुकाने आणि सोशल मीडियाच्या वॉलवरून गावगुंडी खेळणाऱ्या धुरिणांनी निवडणूक वार्तापत्र सुरू केले आहे. अंदाज अपना अपना अशा पद्धतीने हा एक्झिट पोल सुरू आहे

ग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी समोर ठेवून तालुक्यात 'अंदाज अपना अपना'सुरु झाला आहे. कमी-जास्त मतदानानुसार आकडेमोड करीत कार्यकर्ते एक्झीटपोल व्यक्त करीत आहेत. अंदाजातून पैजाही लागत आहेत.
प्रभाग आणि मतदान खोलीनुसार मतदानाचे आकडे समोर आल्यानंतर आता कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे.

गल्ली, रस्ता व वस्तीवरील झालेले मतदान पाहता लगेचच विजयाचे आराखडे सुरू झाले आहे. रोख रकमेसह जेवणाच्या पार्टीवर पैजा सुरू झाल्या आहेत. सोमवार (दि.१८) पर्यंत हा अंदाजपंचे कार्यक्रम करमणुकीचा विषय ठरत आहे. एवढे मात्र खरे.
चार गावांत पती- पत्नी ने आजमावले नशीब ......

सरपंच पदाचे आरक्षण महिलां निघाले तर सोय म्हणून अथवा स्वतः पराभूत झालो तर आणि पत्नी निवडून आली तर झेरॉक्स गावकारभारी म्हणून मिरवता येईल म्हणून अवघे कुटुंबच राजकारणांत रंगलेले दिसले. शिरवाडे वणी येथे शरद काळे त्यांच्या पत्नी अश्विनी काळे तेथेच अशोक निफाडे व पत्नी वंदना निफाडे, मुखेड येथे अमोल जाधव व पत्नी मंजुषा जाधव, कारसुळला देवेंद्र काजळे व पत्नी स्वाती काजळे, तर वडाळी नजिक येथे सुभाष होळकर पत्नी सीमा होळकर आदी रिंगणात होते. त्यामुळे पारावरच्या चर्चेत या जोड्याची चर्चा जास्तच रंगली असल्याने मात्र या घरातील जोडप्यांना ग्रामपंचायत कारभार करण्यासाठी मतदारांनी कौल दिला आहे की, नाही याबाबत उत्सुकता लागली आहे.

पिंपळगाव हद्दीतील १४ गावांच्या झालेल्या निवडणुकीत शिरवाडे वणी ८८ टक्के, नांदूर कुर्द८८.९३, उंबरखेड ८५, बेहड ८०, आहेरगाव ८३, शिरसगाव ८५.१३, वडाळी नजीक ८९.७५, कारसुळ ८८.६६, रानवड ८३ तर मुखेड ९४.२०, वावी ठशी ९१.४४, सावरगाव ९१.४९, अंतरवेली ९२.२५ आणि रेडगाव ९४ या लहान गावातील मतदानाने नव्वदी ओलांडली आहे.
 
Web Title: What is the only issue on the exit poll of Gram Panchayat elections? ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.