कोरोना हद्दपार करण्यासाठीग्रामपंचायतीने कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 06:43 PM2021-05-15T18:43:00+5:302021-05-15T18:43:34+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे कोरोनाने डोके वर काढल्याने गेल्या दहा दिवसांमध्ये पाच जणांचे उपचार घेतांना निधन झाले. आजपर्यंत गावात ४१ जण संक्रमित झाले होते. तर सध्या केवळ दोन जण बाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शनिवारी गावातच आरोग्य विभागाच्या सहकार्याने कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध केली. यामध्ये २० जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये निमगाव येथील १८ जण निगेटिव्ह तर दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन बाधित रुग्ण चिचोंडी खुर्द येथील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

निमगाव मढ गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी येथील सरपंच वंदना दवंगे, उपसरपंच नितीन लभडे, ग्रामसेवक महेश महाले, तलाठी योगेश गिरी, पोलीस पाटील केशव लभडे यांनी गावात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठीअँटीजेन टेस्ट गावातच उपलब्ध करून देत कोरोना गावातून हद्दपार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.
गावात कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी, व्यावसायिकांना नियम दिले आहेत. यावेळी कोरोनाविषयी मार्गदशन देखील करण्यात आले. मुखेड आरोग्य केंद्राचे डॉ. नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. पल्लवी वैद्य, डॉ. व्ही. सी. पैठणकर, डॉ. जी. एन. मढवई, आशासेविका निर्मला शिरसागर, हिराबाई पारधी, यास्मिन शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य वाळू दिवटे, जितेंद्र लभडे, वालुबाई लभडे उपस्थित होते.