....इतिहासाची पुनरावृत्ती ती हीच काय..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:53 AM2021-03-24T01:53:32+5:302021-03-24T01:58:17+5:30
कोरोनाचे महासंकट आणि त्यामुळे देशभरात झालेला लॉकडाऊन. कधी स्वप्नातही आलेला नाही असा कटू अनुभव. खरे तर तो साऱ्यांनीच अनुभवला. मात्र नाशिकच्या जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती निमित्त आपल्या काव्यात्मक भावना अचूक व्यक्त केल्या आणि त्यांच्यातील संवेदनशील मनाचे दर्शन घडवले.
नाशिक- कोरोनाचे महासंकट आणि त्यामुळे देशभरात झालेला लॉकडाऊन.
कधी स्वप्नातही आलेला नाही असा कटू अनुभव. खरे तर तो साऱ्यांनीच अनुभवला.
मात्र नाशिकच्याजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती
निमित्त आपल्या काव्यात्मक भावना अचूक व्यक्त केल्या आणि त्यांच्यातील
संवेदनशील मनाचे दर्शन घडवले.
नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून सुरज मांढरे यांनी नाशिकमध्ये वेगाने
विकासाची सुरू ठेवली असतानाच नेमके कोरेानाचे संकट उदभवले. प्रशासकीय तथा
सनदी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे वेगळीच महत्वाची आणि कळीची जबाबदारी
आली आणि त्यांनी ती नेटाने पारही पाडली. अगदी मालेगावसारख्या संवेदनशील
ठिकाणीही त्यांनी धडक दिली. लॉकडाऊन! त्यामुळे ठप्प झालेली यंत्रणा,
उदध्वस्त झालेली स्वप्ने, टीचभर पोटासाठी संघर्ष, शेकडो मैलांची पायपीट,
कुठे कृतज्ञता तर कुठे माणूसकी... काम करताना एकेक प्रसंग त्यांच्या मनात
कोरले गेले आणि त्यांच्या
मनातील अस्वस्थतेने काव्य रूप घेतले.
प्रगतीचे वेग प्रचंड असताना आणि मंगळावर स्वारीची तयारी करीत असताना एका
सुक्ष्म कणाने (विषाणूने) पृथ्वीच्या अस्तित्वालाच सुरूंग लावला आणि
सृष्टीच्या पलिकडे शोधणाऱ्या नव्या पिढीला एका कोनाड्यात बंदीस्त करून
ठेवले. ही त्यांची अनुभूती त्यांच्याच काव्य रचनेत..
कोटी वर्षे अबाधित पृथ्वीच्या अस्तित्वाला
सुरूंग लावणारा एक कण
अवतरला या पृथ्वीवर...
आता त्या कणाच्या अस्तित्वाला सुरूंग
लावणारा दुसरा कण..त्याच पृथ्वीवर!
इतिहासाची पुनरावृत्ती ती हीच
काय?
माणसांचा गलबला, कर्मचाऱ्यांची लगबग
आणि
कागदपत्रांची सळसळ मेाहरून
पाहणाऱ्या या भिंती, आज
तात्काळ अतितात्काळ महत्वाचे
अशा साऱ्या लेबलांच्या
राखरांगोळीने माखल्यात...
समाज चालवणारी कचेरी
ती हीच काय?
चंद्रावर उतरलेल्या अन् सूर्याचे
मोजमाप घेणाऱ्या,
स्वतंत्र आणि सीमाव्देष्ट्या अख्ख्या पिढीला,
छत्री सारखे दुमडून घराच्या
कोनाड्यात बंदीस्त करण्याची करामत
एका अदृश्य कणाने केली!
मंगळस्वारीचे नियोजन
करणारी पिढी हीच काय?
- सुरज मांढरे