१८४८ प्रलंबित फायलींचे गूढ काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:07 AM2018-06-15T01:07:33+5:302018-06-15T01:07:33+5:30
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाच्या झाडाझडतीत विविध प्रकरणांतील १८४८ फायली दडवून ठेवल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर सहायक संचालक आकाश बागुल यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे सदरच्या फायली दडविण्याचे गूढ शोधण्यासाठी नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे यांची मदत घेतली. त्यांनी गुरुवारी (दि.१४) दिवसभर या फायलींची तपासणी केली.
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाच्या झाडाझडतीत विविध प्रकरणांतील १८४८ फायली दडवून ठेवल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर सहायक संचालक आकाश बागुल यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे सदरच्या फायली दडविण्याचे गूढ शोधण्यासाठी नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे यांची मदत घेतली. त्यांनी गुरुवारी (दि.१४) दिवसभर या फायलींची तपासणी केली. महापालिकेच्या नगररचना विभागाचा कारभार हा नेहमीच वादग्रस्त ठरतो. त्यात यंदा कारवाईच्या ग्रीन फिल्ड प्रकरणाने भर घातली आहे. ग्रीन फिल्ड प्रकरणात महापालिकेच्या आयुक्तांना माफी मागण्याची नामुष्की आली होतीच, शिवाय याच विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील हे कामाच्या अतिताणामुळे घर सोडून गेले होते. त्यामुळे या विभागामुळे एकूणच प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का बसला होता. या विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण होत नाही. तसेच अन्य फायलींविषयी गंभीर स्वरूपाच्या तक्र ारी प्राप्त झाल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागाची झाडाझडती घेण्याची जबाबदारी तीन अधिकाºयांवर बुधवारी (दि.१३) दिली होती. त्यांनी बुधवारी अचानक या विभागात जाऊन सर्च आॅपरेशन केले आणि प्रलंबित फायलींचा शोध घेतला. यावेळी १८४८ फायली दडविल्याचे आढळल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे, शहर अभियंता संजय घुगे व संगणक विभागप्रमुख पी. बी. मगर यांची पाच सदस्यीय समिती गठित केली आहे. या अधिकाºयांच्या समितीने नगरचना विभागातील अधिकाºयांची उलटतपासणी सुरू केली आहे.
पाच वर्षांपासून फायली पडून
महापालिकेच्या दफ्तर दिरंगाई प्रकरणात सापडलेल्या फायली का प्रलंबित ठेवण्यात आल्या याचा शोध सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही फायली पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित आहेत. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेल्या फायलींची वेगळी संख्या काढण्याचे काम सुरू आहे. सदरच्या फायली आणि तक्रारी ज्या अधिकाºयांकडे प्रलंबित होत्या अशा अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार आहे. नगररचना विभागातील या फायलींबाबत विभागाप्रमुखांकडेही पुरेशी माहिती नसून कोणत्या फायलींची जबाबदारी कोणाकडे होती, हेदेखील कोणाला सांगता येत नाही, अशी स्थिती आहे.
खासगी शेरे...
महापालिकेच्या कोणत्याही फाइलीत हे संबंधित खात्याच्या अधिकाºयांचेच शेरे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र या फाइलींमध्ये खासगी व्यक्तींनी शेरे लिहिल्याची धक्कादायक माहिती आढळली आहे. त्यामुळे आयुक्त हे प्रकरण अत्यंत गंभीर घेण्याची शक्यता आहे.
ग्रीन फिल्ड प्रकरणातील गहाळपत्र सापडले
गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्स प्रकरणातील उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यासंदर्भात महापालिकेला सादर केलेले पत्र अखेर सापडले आहे. सदरचे पत्र महापालिकेत दाखल झाल्यानंतर ते स्वीकारण्यात आले. आणि ग्रीन फिल्डच्या वकिलांनी दिलेल्या या पत्राला रिसिव्हडची प्रत मिळाल्यानंतर ते गहाळ झाले होते या पत्रामुळेच आयुक्तांना न्यायालयात माफी मागावी लागली होती, परंतु हे पत्र अखेरीस नगररचना विभागाच्या संबंधित फाइलीतच आढळले आहे.