हे कसले साेशल डिस्टन्सिंग ? कोरोना तपासणीसह अहवालांसाठी पुन्हा रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:50+5:302021-03-19T04:14:50+5:30
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण सप्टेंबरच्या स्तरावर जाऊन पोहाचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी केंद्रांवर तपासणीसाठी पुन्हा ...
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण सप्टेंबरच्या स्तरावर जाऊन पोहाचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी केंद्रांवर तपासणीसाठी पुन्हा रांगा दिसू लागल्या आहेत. तर नमुन्यांची संख्या वाढल्याने अहवाल मिळण्यासदेखील विलंब लागत आहे. त्यामुळे अहवाल मिळवण्यासाठी पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने कितीही निर्देश दिले तरी अशा ठिकाणी साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून त्यातूनही पुन्हा कोरोना प्रसारात भर पडण्याची चिन्हे आहेत.
कोरोनाच्या तपासणीसाठी ऑक्टोबर महिन्यापासून संशयितांची संख्या रोडावत गेल्याने या केंद्रांवरील गर्दी अत्यंत कमी तर रांगा दिसणेच बंद झाले होते. त्यानंतरचे तब्बल ५ महिने नागरिकांची गर्दी कुठल्याच केंद्रावर दिसली नाही. मात्र, मार्च महिन्याच्या प्रारंभापासून पुन्हा कोरोना तपासणी केंद्रांवर तुरळक प्रमाणात गर्दी जाणवू लागली. तर मार्चच्या मध्यापर्यंत तर या केंद्रांवरील गर्दीने वेगळाच प्रश्न निर्माण केला आहे. या केंद्रांवर तपासणीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे तसेच अहवालांसाठी लागणाऱ्या रांगांमुळे सामाजिक अंतराचे भान राखणे कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या केंद्रांमुळेदेखील कोरोनाचा प्रसार होण्यास वाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अशा केंद्रांवरदेखील गर्दीला भान राखण्याचे सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीदेखील नागरिकांमध्ये अजिबात जागरुकता येत नसल्याने अशा केंद्रांवरुनदेखील कोरोना प्रसार हातभार लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोट
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी घराबाहेर प्रत्येक ठिकाणी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाबाबत सांगितलेली मास्क, सामाजिक अंतर आणि हात धुण्याची त्रिसूत्री आताच्या काळात तर अधिक आवश्यक झाली आहे. समाजाने या सर्व दक्षता बाळगल्याशिवाय कोरोनावर मात करणे शक्य होणार नाही.
डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मनपा आरोग्य अधिकारी
चौकटी
केंद्रांवरही पोलीस नियुक्तीची गरज
नागरिक ज्या केंद्रांवर सर्वाधिक गर्दी करीत आहेत, किंवा रांगा लावाव्या लागत आहेत. अशा केंद्रांवरदेखील सामाजिक अंतर पाळले जावे, यासाठी किमान एक पोलीस नियुक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिक गर्दी होणाऱ्या केंद्रांवर किमान एक पोलीस किंवा सुरक्षा रक्षक ठेवून त्यांच्या माध्यमातून नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
कोट
आम्ही सकाळपासून चाचणीसाठी आलो आहोत. पण केंद्रावर गर्दी खूप असल्यामुळे दोन तासांहून अधिक वेळ थांबावे लागले. तसेच या ठिकाणी असलेली गर्दी बघूनदेखील घाबरायला होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जर केंद्रांवर गर्दी होणार असेल तर ज्याला कोरोना झालेला नसेल त्यालादेखील कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संदीप दाणी , नागरिक
--------------------------------
कोट
चाचणीसाठी खूप गर्दी झालेली असून रांगेत आमचा क्रमांक जवळपास पन्नासपेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीत किती वेळ लागेल, ते सांगता येत नाही. मात्र, या गर्दीमुळे आम्हाला कोरोना झालेला नसला तरी गर्दीत कुणामुळे होईल का , अशी शंका मनात निर्माण होत असल्याने अजूनच भीती वाढली आहे.
प्रसाद प्रभुणे, नागरिक
-----------------------------------
सूचना
ही डमी आहे.