देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखाली दडलंय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:20 AM2017-12-13T01:20:46+5:302017-12-13T01:22:22+5:30

देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखालील असलेल्या जागेला ग्रहण लागले आहे.

What is the status of the second long distance land in the country? | देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखाली दडलंय काय?

देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखाली दडलंय काय?

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील रहदारीवर ताण चौपाटीलगतही होणाºया गर्दीमुळे दुर्घटना

नाशिक : देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखालील असलेल्या जागेला ग्रहण लागले असून, अनधिकृत पार्किंग, कचराकुंडी आणि अतिक्रमणे होत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक भिकाºयांसाठी ते आश्रयस्थान झाले असून, यात सुधारणा केव्हा करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातून जाणाºया मुंबई-आग्रा रोडवर असलेल्या वाहतुकीच्या ताणामुळे शहरातील रहदारीवर ताण वाढतो आणि अपघातही होत असतात. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. उड्डाणपूल बांधण्यासाठी झालेला श्रेयवाद आणि त्यानंतर पुलाचा उपयोग किती झाला, बोगदा बंद करणे, रॅम्प उतरविण्याची ठिकाणे अशा अनेक विषयांवर चर्चा झडल्या. पुलाखालील जागेचा काय? असा देखील मुद्दा अभ्यासकांनी चर्चेत मांडला. त्यानंतर राज ठाकरे यांनी उड्डाणपुलाखालील जागेचा दुरुपयोग होऊन बकालपण वाढू नये यासाठी सुशोभीकरणाची कल्पना मांडली. त्यानुसार एका कंपनीने सामाजिक दायित्व निधीअंतर्गत कामे करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार काही ठिकाणी शोभिवंत झाडे लावण्यात आली आणि काही भागांत पुलाखालील पिलर्सवर चित्रेही रेखाटण्यात आली. परंतु हे मोजक्या भागात. उर्वरित भागात जमेल त्या ठिकाणी जमेल ते सुरू आहे. काही ठिकाणी चक्क दुचाकी, चारचाकी आणि ट्रक सर्रास उभ्या केल्या जातात. वाहनतळासाठी मोफत जागा उपलब्ध झाल्याने अनेक व्यावसायिकांचे फावले आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी टपºया थाटल्या असून, पुलाच्या भिंतीलगतच चौपाटी साकारली आहे, तर काही ठिकाणी भिकाºयांची आश्रयस्थाने झाली आहेत. उड्डाणपुलाचे नेमके काय करायचे, सुशोभिकरण की वाहनतळ, चौपाटी की भिकाºयांचे आश्रयस्थान यावर कोणते धोरण ठरविण्यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला वेळ नाही. त्यामुळे या पुलाचे नक्की काय होणार? हा प्रश्न आहे.
अपघात झाल्यास जबाबदार कोण?
पुलाखालील वाहने काढताना-ठेवताना अपघात घडू शकतो किंवा पुलाच्या भिंतीलगत असलेल्या चौपाटीलगतही होणाºया गर्दीमुळे दुर्घटना होऊ शकते. पुलाखालील जागेबाबत अशी दुर्घटना घडल्यानंतर निर्णय घेतला जाणार काय? असा प्रश्न आहे.

Web Title: What is the status of the second long distance land in the country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.