मृगाच्या गाढवाने दिला धोका आता आर्द्राचा कोल्हा काय करणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:36+5:302021-06-24T04:11:36+5:30
चौकट- ...तर खत-बियाणे कसे मिळणार? कोट- संपूर्ण मृग कोरडा गेला आहे. जून महिना संपला तरी पेरणी करता आलेली नाही. ...
चौकट-
...तर खत-बियाणे कसे मिळणार?
कोट-
संपूर्ण मृग कोरडा गेला आहे. जून महिना संपला तरी पेरणी करता आलेली नाही. यामुळे आता पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी एकच लगीनघाई होईल. खते - बियाणे खरेदीसाठीही गर्दी होणार असल्याने सर्वांना खत मिळेल का, हा प्रश्नच आहे. - रावसाहेब आहिरे, शेतकरी
कोट-
गतवर्षी युरियाची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. आम्हाला त्यासाठी दुसऱ्या तालुक्यात जावे लागले होते. यावर्षी तर अजून पेरणी नसल्याने कुणी खरेदी करत नाही. पण, पेरण्या झाल्यावर सर्वांनाच घाई होईल तेव्हा काय.
- प्रभाकर माळी, शेतकरी
कोट-
हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला. पण, पावसाने तो पूर्णपणे चुकीचा ठरविला आहे. पाऊसच नसल्याने पेरण्या करण्याची हिंमत होत नाही. आधीच बियाण्यांचा भरोसा नाही. त्यात दुबार पेरणीचे संकट आले तर शेतकरी पूर्णपणे अडचणीत येतील. - अंबादास घुसळे, शेतकरी