व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनने घेतली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:37 PM2020-04-05T23:37:38+5:302020-04-05T23:38:28+5:30

सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा जंग जंग पडत असताना सोशल मीडियामधून मात्र उलट सुलट संदेश प्रसारित करून अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सायबर सेलने थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनकडून ग्रुपची सेटिंग बदलण्यात येत असून, काही ठिकाणी बनविण्यात आलेले ग्रुपदेखील डिलीट केले जात आहेत.

WhatsApp group admin took over | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनने घेतली धास्ती

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनने घेतली धास्ती

googlenewsNext
ठळक मुद्देसिन्नर : अनेक ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा जंग जंग पडत असताना सोशल मीडियामधून मात्र उलट सुलट संदेश प्रसारित करून अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सायबर सेलने थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनकडून ग्रुपची सेटिंग बदलण्यात येत असून, काही ठिकाणी बनविण्यात आलेले ग्रुपदेखील डिलीट केले जात आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधानांनी १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील आपापल्या कार्यक्षेत्रात जमाबंदी व संचारबंदीचा आदेश लागू केले आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया विशेषकरून व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित होणाºया कोरोनाबद्दलच्या संदेशांवर नियंत्रण नसल्याने अनेकदा अफवांचे पेव फुटून उलटसुलट चर्चांना उधाण आल्याच्या घटना घडल्या आहेत. इतर व्हॉॅट्सअ‍ॅप ग्रुपवरून आलेले संदेश खातरजमा न करता पुढे पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून प्रसारित होणाºया संदेशांवर लक्ष ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
अनेक ग्रुप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करत इतर सदस्यांना संदेश पाठवण्यापासून रोखले आहे. त्याहीपुढे जात काही ग्रुप अ‍ॅडमिनकडून थेट ग्रुप रिमुव्ह करण्यात येत आहेत.
सध्याच्या काळात सोशल मीडिया व विशेषकरून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना सबुरीचा सल्ला घेण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आल्याने आता प्रत्येक जण आपल्याला येणाºया संदेशाची खातरजमा करूनच पुढे पाठवण्याची खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. ..धाबे दणाणले राज्याच्या विविध भागात पोलीस अधिकाऱ्यांकडून ग्रुप अ‍ॅडमिनला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून एखादा समाज विघातक संदेश किंवा अफवा पसरवणारा संदेश प्रसारित झाला तर व्यक्तिगत जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप एडमिनचे धाबे दणाणले आहे.

Web Title: WhatsApp group admin took over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.