दळवटला आगीत गहू खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:36 AM2018-03-19T00:36:22+5:302018-03-19T00:36:22+5:30
कळवण : तालुक्यातील दळवट येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून शनिवारी दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाला त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
कळवण : तालुक्यातील दळवट येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून शनिवारी दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाला त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. भर दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान शेतावरु न जाणारी जीर्ण झालेली एक तारा पडल्यामुळे शेतात काढणीसाठी आलेल्या गव्हाने पेट घेतला. या आगीत एकरभर गहू जळून खाक झाल्याचे सरपंच रमेश पवार यांनी सांगितले. आजूबाजूच्या शेतात काम करणाºया आदीवासी शेतकरी बांधवांनी शेतात धाव घेऊन गव्हाला लागलेली आग विझविल्यामुळे शेतालगत असलेल्या दहा ते बारा एकरातील उभ्या गव्हाचे संभाव्य नुकसान टळाले. वीज वितरण कंपनीने व शासकीय यंत्रणेने अकस्मात घडलेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसानभरपाई देऊन आदिवासी शेतकºयास दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे. कळवण तालुक्यात दळवट व परिसरात सन १९७८ मध्ये वीज पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या तारा आता जीर्ण झाल्याने तुटत असल्याचे दळवट ग्रामपंचायतने वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन देऊन कळविले आहे. वीज तारा बदलण्याची मागणी केली होती; मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग घडल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. ग्रामीण व आदीवासी भागात वीज वितरण कंपनीचे वीज तारांचे पसरलेले जाळे हे आता जीवघेणे ठरत आहे. लोंबकळणाºया तारांमुळे दरवर्षी शेतातील पिकांचे नुकसान होत आहे महावितरण कंपनीने कळवण तालुक्यातील वीज वितरण समस्यांचे सर्वेक्षण करून जीर्ण तारा, पोल बदलावे अशी मागणी नितीन पवार यांनी केली आहे. वीजवितरण कंपनीने पाऊले उचलावीतवीजपुरवठा जोडणी करण्यासाठी शेतातून तारा ओढलेल्या आहेत. त्या तारा जीर्ण झाल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी पाऊले उचलावीत अशी मागणी नितीन पवार यांनी केली आहे.