तांदळाच्या आगारात गव्हाचे पीक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 07:19 PM2021-02-22T19:19:27+5:302021-02-22T19:20:46+5:30
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर, भरवीर खुर्द, धामणगाव तांदळाचे आगार मानले जाते. परिसरातील विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाणारे तांदूळ खूपच प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात तांदळाचे पीक घेतले जाते. बहुतेक शेतकरी येथे भाताचीच लागवड करतात. अशा कवडदरा, घोटी गावात शिक्षक बंधूंनी गव्हाचे पीक घेतले आहे. शिक्षकी पेशातील या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत केलेले नवनवीन प्रयोग येथे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याचप्रमाणे आतादेखील तरारुन आलेले गव्हाचे पीक चर्चेचा विषय ठरत आहे.

भरवीर येथील शिक्षक बंधू लक्ष्मण व भरत झनकर यांनी नवीन प्रयोग करत शेतात गव्हाच्या पिकाची यशस्वी लागवड केली आहे. त्यांनी आपल्या पंधरा गुंठे क्षेत्रापैकी दहा गुंठे क्षेत्रात टोकन पद्धतीने श्रीराम जातीचे गव्हाचे पीक लावले.
या वेगळ्या प्रयोगाची जोखीम स्वीकारत आणि त्याला परिश्रम व प्रयोगशीलतेची जोड देत पिकाची निगा राखली. परिणामी, गव्हाचे पीक जोमात आले आहे.
एका किलोपासून शंभर किलो गव्हाचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरात गव्हाचीही शेती होऊ शकते, असा विश्वास अनेकांना आला आहे, तसेच शेताच्या बांधावर विविध फळांची झाडे तर काही भागात भाजीपाला घरगुती सेंद्रिय पद्धतीने केला असून, परिसरातील अनेक तरुण शेतकरी या शेतावर येऊन भेट देत पाहणी करत आहेत. कवडदरा परिसरातील शेतकरी पारंपरिक भात पिकाऐवजी दुसऱ्या पिकांकडे वळत आहे. भाताबरोबरच गहू, ज्वारी, पालेभाजांची शेती होऊ लागली आहे.
(२२ कवडदरा)
कवडदरा परिसरातील भाताच्या शेतात गव्हाचे पीक नवा प्रयोग.