पूर्वभागात गहू काढणीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:44 AM2019-03-11T00:44:03+5:302019-03-11T00:44:19+5:30

नाशिक तालुक्याच्या पूर्वभागात गहू आणि कांद्याचे पीक मुबलक प्रमाणात आले आहे. महिनाअखेर व एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात पिके काढणीस सुरुवात होईल.

Wheat Extraction Speed in the East | पूर्वभागात गहू काढणीस वेग

पूर्वभागात गहू काढणीस वेग

Next
ठळक मुद्देदराअभावी कांदा उत्पादक नाराज : भाजीपाला जोरात

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्वभागात गहू आणि कांद्याचे पीक मुबलक प्रमाणात आले आहे. महिनाअखेर व एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात पिके काढणीस सुरुवात होईल.
नाशिक तालुका पूर्वभागातील एकलहरे, गंगावाडी, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव, पाडळी, कालवी, हिंगणवेढा, जाखोरी, चांदगिरी, कोटमगाव, जुने समनगाव, चाडेगाव, नवीन सामनगाव या पंचक्रोशीत गहू, कांदे, ऊस, द्राक्षे, भाजीपाला ही नगदी पिके घेतली जातात. दारणा व गोदावरी या दोन्ही नद्यांच्या पाण्यावर ही शेती होत असल्याने बारमाही हिरविगार पिके या भागात घेतले जातात. नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये पेरलेला गहू आता पिवळा झाला असून, मार्च अखेरपर्यंत तो कापणीस येईल. काही ठिकाणी आगाऊ पेरलेला गहू कापणीस सुरुवात झाली आहे.
कांदे मुबलक, पण दरामुळे नाराजी
तालुक्याच्या पूर्वभागात रांगडा व उन्हाळ कांद्याची लागवड ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून, नोव्हेंबरमध्ये लागवड केलेला लाल कांदा येत्या आठवडाभरात काढला जाईल. हा कांदा लालभडक व आकाराने मोठा असतो. तो काढल्यानंतर लगेचच मार्केटमध्ये नेला जातो. साधारणत: नाशिक, पिंपळगाव, सायखेडा, लासलगाव येथील मार्केटमध्ये हा कांदा नेला जात असला तरी, सध्या कोसळलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
भाजीपाल्याचे अमाप पीक
गहू, कांदा, ऊस, द्राक्षे या ठोक पिकांबरोबरच या भागात भाजीपाला शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कमी श्रमात, कमी कालावधीत रोख पैसा देणारा भाजीपाला शेतकरी बाराही महिने करतात. कोबी, फ्लॉवर, वांगे, गवार, मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, करडई यांसह वेलवर्गीय कारले, गिलके, दोडके, वाल, पावटा, भोपळा या भाज्यांची लागवड करून महिना दीड महिना ते दोन महिन्यांत हा भाजीपाला मार्केटला नेऊन किरकोळीने विकला जातो. त्यामुळे शेतकºयाच्या हाती दररोजचा नगद पैसा येतो.

Web Title: Wheat Extraction Speed in the East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.