शेतातील गव्हाची रास केली खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:30 PM2020-03-27T23:30:49+5:302020-03-27T23:31:03+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान कसबे सुकेणे येथील दत्ता रामराव पाटील या युवा शेतकºयाने शेतातील नुकताच काढलेला नवा गहू गोरगरीब मजूर कुटुंबांना खुला करून माणुसकीचा ओलावा अजूनही टिकून असल्याचे दाखवून दिले आहे.

The wheat fields in the field are open | शेतातील गव्हाची रास केली खुली

शेतातील गव्हाची रास केली खुली

googlenewsNext
ठळक मुद्देगोरगरिबांना आधार : सुकेणेतील शेतकऱ्याचा दातृत्वभाव


कसबे-सुकेणे येथे गरिबांना शेतातील गहू विनामूल्य वितरित करताना दत्ता पाटील.


योगेश सगर ।
कसबे सुकेणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान कसबे सुकेणे येथील दत्ता रामराव पाटील या युवा शेतकºयाने शेतातील नुकताच काढलेला नवा गहू गोरगरीब मजूर कुटुंबांना खुला करून माणुसकीचा ओलावा अजूनही टिकून असल्याचे दाखवून दिले आहे. लॉकडाउनमुळे गोरगरीब शेतमजूर रोजगारापासून दुरावले आहेत. त्यात त्यांची उपासमार होऊ नये यासाठी खºया अर्थाने या शेतकºयाने आपल्या आडनावाला साजेशी पाटीलकी जपली आहे.
देशात सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. परिणामी कसबे-सुकेणे येथील संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्याने मोलमजुरी करून कौटुंबिक गुजराण करणारा वर्ग बसून आहे. परंतु याच मजुरांसाठी कसबे-सुकेणेतील एक युवा शेतकरी देवदूत म्हणून पुढे आला असून, निराधार कुटुंबांचा तो आधार ठरला आहे. कसबे-सुकेणे येथील दत्ता पाटील यांनी सालाबादप्राणे एक एकर शेतातील सोंगणी करीत गव्हाची रास शेतातच ठेवली होती. पाटील यांच्या शेतालगतच बेघरवस्ती असून, या वस्तीवरील संपूर्ण कुटुंब हे मोलमजुरी करणारे आहेत. सध्या सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडाउनमुळे हातांना काम नसल्याने यातील काही कुटुंबांच्या घरात अन्नधान्याचा तुटवडा आहे. अशातच ही मंडळी उपाशी झोपत असल्याचे समजताच दत्ता पाटील यांनी कुठलाही विचार न करता गव्हाची रास खुली केली.
शेतकरी दत्ता पाटील यांनी आपल्या शेतातील गव्हाची रास खुली करून दिल्यानंतर साहजिकच लोकांची गर्दी होण्याचा अंदाज पाटील यांना होताच. परंतु, सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगमुळे पाटील यांनी आपल्या शेताकडे येणाºया पायवाटेवर पांढरे चौकोन आखत संबंधितांना दोघांमध्ये अंतर ठेवण्याचे आवाहन केले. गोरगरीब कुटुंबांनीही शिस्तीचे दर्शन घडवले.

Web Title: The wheat fields in the field are open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.