दिंडोरी तालुक्यात द्राक्षासह गहू, हरभरा पीक भूईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:41 AM2021-02-20T04:41:34+5:302021-02-20T04:41:34+5:30
दिंडोरी शहरासह जानोरी, मोहाडी, खडक सुकेना, चिंचखेड, जोपुळ, खेडगाव, शिंदवड, तिसगाव या परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसा ...
दिंडोरी शहरासह जानोरी, मोहाडी, खडक सुकेना, चिंचखेड, जोपुळ, खेडगाव, शिंदवड, तिसगाव या परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसा बरोबर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाल्याने तयार झालेल्या द्राक्षबागा, गहू, हरभरा, भाजीपाला पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिंचखेड व जउळके वणी येथील काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या असून जानोरी परिसरात देखील गारपीटमुळे तयार झालेल्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महसूल विभागाने झालेल्या नुकसानीबद्दल त्वरित पंचनामा करून शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
फोटो - १९ दिंडोरी ग्रेप्स
जानोरी येथील शेतकरी माणिक घुमरे यांच्या द्राक्ष बागेचे झालेले नुकसान.
===Photopath===
190221\19nsk_37_19022021_13.jpg
===Caption===
जानोरी येथील शेतकरी माणिक घुमरे यांच्या द्राक्ष बागेचे झालेले नुकसान.