डोंगरगाव परिसरात गहू भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 09:22 PM2021-03-22T21:22:40+5:302021-03-23T02:16:13+5:30
मेशी : मेशीसह डोंगरगाव परिसरात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मेशी : मेशीसह डोंगरगाव परिसरात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डोंगरगाव येथील जिभाऊ सावंत यांच्या शेतातील काढणीवर आलेला तीन एकरावरील गहू भुईसपाट झाला आहे. अचानक आलेल्या पावसाने सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात मेशीफाटा येथील शेत वस्तीवर राहणारे बापू भिका शिंदे यांच्या शेतातील गोट फार्मवर दुपारी अचानक आलेल्या पावसात वीज कोसळली. यामुळे एक शेळी मृत्यूमुखी पडली असून, गोट फार्मचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचबरोबर मेशीसह डोंगरगाव परिसरातील गहू, हरभरा, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच गोट फार्मचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.