गव्हाच्या दरात चार रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:31+5:302021-01-25T04:16:31+5:30
चौकट- साखर उतरली किराणा बाजारात साखरेच्या दरात किलोमागे ७५ ते ८० पैशाची घसरण झाली असून, सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव ...
चौकट-
साखर उतरली
किराणा बाजारात साखरेच्या दरात किलोमागे ७५ ते ८० पैशाची घसरण झाली असून, सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव स्थिर आहेत. सोयाबीन तेलाच्या दरामध्येही बऱ्यापैकी घसरण झाली आहे.
चौकट-
मेथी २४ रु जुडी
नाशिक बाजार समितीमध्ये पालेभाज्यांच्या दरात थोडीफार वाढ झालेली दिसून येत आहे. घाऊक बाजारात मेथीला ८ पासून २४ रुपये जुडी दर मिळत आहे. फळभाज्यांची आवक आणि भाव स्थिर आहेत.
चौकट-
टरबूज ८ रुपये किलो
बाजार समितीमध्ये द्राक्षांबरोबरच टरबुजांचीही आवक सुरू झाली असून, सध्या टरबुजाला घाऊक बाजारात ३ ते ८ रुपये किलोचा दर मिळत आहे. संत्रा, मोसंबी, सफरचंद आदी फळांची आवक स्थिर आहे.
कोट -
ग्राहकांचे सध्या मोठ्या मॉलमधील ऑफरकडे लक्ष असल्याने किरकोळ किराणा बाजारात फारसा उत्साह जाणवत नाही. यामुळे येथील ग्राहकी जेमतेम आहे. गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. इतर किराणामालाचे भाव मात्र स्थिर आहेत.
- शेखर दशपुते, किराणा व्यापारी
कोट-
ग्रामीण भागात दिवसा वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना भर थंडीत रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या या कष्टाचे मोल कुठेही केले जात नाही.
- अविनाश दौंडे, शेतकरी
कोट -
गेल्या काही दिवसापासून वाढलेले तेलाचे दर स्थिर झाले असल्याने काहीसे समाधान आहे. किरकोळ बाजारात भाजीपाला अद्याप महागच आहे. सर्वसामान्यांना तो चढ्या भावानेच खरेदी करावा लागतो.
- रेखा पगारे, गृहिणी