येवला तालुक्यात गहू उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:37 AM2020-03-09T11:37:59+5:302020-03-09T11:39:42+5:30
पाटोदा :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
पाटोदा :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यतच उत्पन्न निघत असल्याने गहू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हरभरा व ज्वारीच्या पिकाचीही हिच अवस्था झाली असल्याने आता शेतात कोणते पीक घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. गहू काढणीसाठी शेतकरी मोठया प्रमाणात हार्वेस्टरचा वापर करतांना दिसत आहे.नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकरी वर्गाचे हित लक्षात घेऊन सध्या हार्वेस्टरमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला असून या नवीन हार्वेस्टरमध्ये गव्हाचा भुसा देखील साठवला जात असल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होत असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी सामना करीत शेती करीत आहे.दिवाळीनंतर तालुक्यातील निम्यापेक्षा जास्त गावांना पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शेतीला कुठून येणार अशी परिस्थिती असल्याने गेल्या काही वर्षांपासून गव्हाचा पेरा कमी कमी होत चालला होता . यंदा समाधान कारक पाऊस पडल्याने विहिरी नाले तसेच साठवण बंधारे पाण्याने तुडुंब भरल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली होती.पेरणी नंतर पिक जोमदार आले .मात्र पिक वाढीच्या काळात वातावरणात बदल झाल्यामुळे गव्हावर मावा व करपा,तांबेरा या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिके धोक्यात येऊन त्यांची वाढ खुंटली . शेतकºयांनी औषध फवारणी करून पिके जगविली .हजारो रु पये खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर पसरला आहे. एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंतच उत्पन्न निघत असल्याने गहू पिकासाठी केलेला केलेला उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने गहू उत्पादक शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.