येवल्यात गहू उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:24 PM2020-02-23T23:24:44+5:302020-02-24T00:51:53+5:30
जळगाव नेऊर : परिसरासह येवला तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू सोंगणीला सुरु वात केली आहे. यावर्षी गव्हाच्या ...
जळगाव नेऊर : परिसरासह येवला तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू सोंगणीला सुरु वात केली आहे. यावर्षी गव्हाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असली तरी बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे. शेतकरी गहू सोंगणीला हार्वेस्टर मशीनला पसंती देत असल्याने राज्य, परराज्यातून हार्वेस्टर मशीन दाखल झाले आहेत.
स्थानिक गहू उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून हार्वेस्टर मशीनद्वारे गहू सोंगणीचा व्यवसाय सुरू केला आहे. दरवर्षी पंजाब व हरयाणा राज्यातील हार्वेस्टर महाराष्ट्रात दाखल होतात. परंतु ठरावीक कालावधीनंतर हे मशीन परत जातात. त्यामुळे उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकाला सोंगणीसाठी हार्वेस्टर मशीन मिळत नसल्याने अनेक शेतकºयांना मजूर लावून सोंगणी करावी लागते. त्यामुळे स्थानिक तरु णांनी हार्वेस्टर मशीन विकत घेऊन शेतीला जोडधंदा म्हणून पर्याय शोधला आहे. तसेच हार्वेस्टर मशीनमधून गहू, मका, सोयाबीनची चाळणी बदल करून सोंगणी होत असल्याने वर्षभर व्यवसाय सुरू असतो. सध्या गव्हाची सोंगणी सुरू असल्याने या मशीनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. हार्वेस्टरने तीस मिनिटात एक एकर गव्हची सोंगणी केली जाते. दोन हजार रु पये प्रतिएकर सोंगणी असा दर मिळत आहे.
रोगट हवामानाचा सामना
वातावरण बदलामुळे गव्हाचे उत्पादन घटले. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे व कांदा रोपे नसल्यामुळे शेतकºयांनी गहू पिकाला पसंती दिली. परंतु ढगाळ वातावरण, थंडीचा अभाव यामुळे या पिकास रोगट हवामानाचा सामना करावा लागला. परिणामी गहू उत्पादनात घट निर्माण झाली आहे. सध्या गव्हाची सोंगणी सुरू असून, गव्हाला साधारणपणे एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन निघत आहे. हेच उत्पादन शेतकºयांना २० क्विंटलपर्यंत निघणे अपेक्षित होते, परंतु ढगाळ व परतीच्या पावसाचा फटका गहू पिकाला बसल्याने उत्पादनात घट निर्माण झाली आहे.
स्वत:चे गव्हाचे क्षेत्र आहे. पंजाब, हरयाणातून दाखल झालेले हार्वेस्टर मशीन मालक साधारणपणे महिनाभर कमाई करून आपल्या राज्यात परत जातात. उशिराने लागवड केलेला गहू सोंगणीसाठी पंचायत होत असे. स्थानिक शेतकºयांना आपल्या पिकाची वेळेत सोंगणी करता यावी आणि आपल्यालाही चार पैसे मिळतील या हेतून हार्वेस्टर मशीन विकत घेऊन शेतीला जोडधंदा निर्माण केला.
- देव शिंदे, उद्धव बोराडे, हार्वेस्टर मशीन मालक, जळगाव नेऊर