गोंदे दुमाला ग्रामपंचायतीकडून वृद्धांसाठी व्हीलचेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:24 PM2019-10-21T13:24:53+5:302019-10-21T13:28:16+5:30

Maharashtra Assembly Election 2019 घोटी : लोकशाही व्यवस्था सशक्त आणि बळकट करण्यासाठी विविध स्तरावर प्रशासन उपाययोजना राबवत असते. यापासून बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था लांब राहतात. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीने लोकशाहीच्या उत्सवासाठी स्वयंप्रेरणेने मतदान जनजागृती करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.

Wheelchairs for the elderly by Gondi Dumala Gram Panchayat | गोंदे दुमाला ग्रामपंचायतीकडून वृद्धांसाठी व्हीलचेअर

गोंदे दुमाला ग्रामपंचायतीकडून वृद्धांसाठी व्हीलचेअर

googlenewsNext

घोटी : लोकशाही व्यवस्था सशक्त आणि बळकट करण्यासाठी विविध स्तरावर प्रशासन उपाययोजना राबवत असते. यापासून बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था लांब राहतात. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीने लोकशाहीच्या उत्सवासाठी स्वयंप्रेरणेने मतदान जनजागृती करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव यांच्या संकल्पनेनुसार मतदान केंद्राबाहेर ग्रामपंचायतीतर्फे स्वतंत्र मंडप उभारण्यात येऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले. गावातील दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना आपला हक्क बजावता यावा म्हणून ग्रामपंचायतीने व्हीलचेअर आणि मदतीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्हाभरात मतदान जागृतीसाठी गोंदे दुमाला ह्या एकमेव ग्रामपंचायतीने स्वत:हून पुढाकार घेतल्याबद्धल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी कौतुक केले आहे.
ग्रामविकास अधिकारी हनुमान दराडे, सुनील नाठे, गणेश शेळके, भाऊसाहेब कातोरे, आशा कर्मचारी विद्या जाधव, जयश्री आहेर, भारती जाधव, भारती नाठे, मोनाली नाठे, दत्तू नाठे, जनार्दन नाठे, केरू ठाणगे, रंगनाथ नाठे, हिरामण जाधव यांनी केला. त्यानुसार गोंदे दुमाला येथील दोन्ही मतदान केंद्राच्या बाहेर मतदार राजासाठी मंडप उभारण्यात आला. स्वागत कमानीत मतदारांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. फुगे आण िफुलांचा वापर करून मतदान केंद्र सजवण्यात आले. दिव्यांग आण िवयोवृद्ध मतदारांसाठी व्हील चेअर घेऊन ग्रामपंचायत कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले. गावातून जास्तीतजास्त मतदान लोकशाहीसाठी बळकटी आणू शकते ह्या विश्वासाने ग्रामपंचायतीने काम केले. ग्रामपंचायतीच्या सुविधेचा मतदारांनी लाभ घेऊन मतदान केले.

Web Title: Wheelchairs for the elderly by Gondi Dumala Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.